भारत (India)आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना आज, 22 नोव्हेंबर, शुक्रवारपासून सुरू झाला आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता हा समान सुरू झाला आहे. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर सुरू असलेल्या या महत्त्वाच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. सुरुवातीलाच यशस्वी जैस्वाल 0 धावांवर बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत 2 विकेट घेतल्या आहेत.
या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये यावेळी मोठा बदल दिसून आला आहे. या सामन्यात दोन तरुण खेळाडूंना प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाल्याने रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना बाहेर बसावे लागले आहे.
नितीश रेड्डी आणि हर्षित राणा या दोन खेळाडूंनी भारताकडून(India) कसोटी पदार्पण केले आहे. नितीश रेड्डी आणि हर्षित राणा प्लेइंग-11 मध्ये आल्याने रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना बाहेर बसावे लागले आहे. विराट कोहलीने पदार्पणाची कॅप नितीशला दिली तर अश्विनने पदार्पणाची कॅप राणाला दिली. भारताच्या प्लेइंग-11 मध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या रूपाने एकच स्पेशलिस्ट स्पिनर आहे. गेल्या 10 वर्षांतील असे पाचव्यांदा घडले आहे जेव्हा अश्विन आणि जडेजा यांना भारताच्या कोणत्याही कसोटी सामन्याच्या प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले नाही.
केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (w), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (क), मोहम्मद सिराज.
हेही वाचा :
आठवडाभरात महाराष्ट्रात कडाक्याची थंडी
शुक्र-शनीची होणार युतीया’ 4 राशींचं उजळणार भाग्य,
“निवडणुकीच्या निकालापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला झटका