अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांच्या दुसऱ्या कार्यकाळात कडक इमिग्रेशन नियमांची अंमलबजावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, न्यू जर्सीच्या नेवार्क विमानतळावर भारतीय पालकांना प्रवेश नाकारण्यात आला. ही जोडी आपल्या मुलांना भेटण्यासाठी बी-1/बी-2 पर्यटक व्हिसावर अमेरिकेला गेली होती आणि पाच महिने राहण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, त्यांच्याकडे परतीचे तिकीट नसल्यामुळे, नवीन 2025 च्या नियमानुसार, त्यांना भारतात परत पाठवले गेले.
या घटनेने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण केला आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी 2025 च्या नवीन नियमानुसार परतीचे तिकीट असणे अनिवार्य असल्याचे सांगितले. मात्र, या नियमाविषयी कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पूर्वसूचना दिली गेली नव्हती. यामुळे, अनेक प्रवाशांना अमेरिकेच्या(Donald Trump) इमिग्रेशन प्रक्रियेबद्दल अनिश्चितता वाटत आहे.
या घटनेमुळे भारतीय प्रवासी आणि अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. विशेषतः जे तात्पुरत्या व्हिसावर (उदा. H1-B) अमेरिकेत आहेत, त्यांच्यासाठी परिस्थिती अधिक कठीण झाली आहे. ट्रम्प यांच्या कडक इमिग्रेशन धोरणांमुळे आधीच तणावात असलेल्या भारतीय कुटुंबांसाठी ही घटना एक इशारा ठरली आहे.
भारतीय प्रवाशांना आता त्यांच्या सर्व कागदपत्रांची अधिक काळजीपूर्वक तयारी करणे गरजेचे आहे. परतीचे तिकीट, प्रवासाचे पुरावे आणि इतर आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित ठेवल्यास अशा घटनांपासून बचाव होऊ शकतो. अमेरिकेतील नवीन धोरणांमुळे भविष्यात आणखी कठीण अटी लागू होण्याची शक्यता असल्यामुळे सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.
हेही वाचा :
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; 40 वर्षांपासून सोबत असलेल्या बड्या नेत्याने सोडली साथ
कलानगर महागणपती गणेशोत्सव मंडळाला कोल्हापूर पोलीस विभागाकडून उत्कृष्ट पुरस्काराने सन्मान
‘मार्केटिंग करून नेता होता येत नाही तर…,’ 10 वर्षांत काय केलं?, शाहंनी पुन्हा पवारांना डिवचलं