भारताला धक्काच! ‘लापता लेडिज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाद

ऑस्कर 2025 मध्ये आमिर खान आणि किरण राव यांच्या संयुक्त निर्मितीच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाकडून भारताला खूप आशा होत्या, पण हा चित्रपट ऑस्करच्या(Oscar) शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा हा चित्रपट अकादमी पुरस्कारांसाठी निवडला जाईल अशी अपेक्षा होती, परंतु दुर्दैवाने हा चित्रपट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला नाही. मात्र, भारताच्या आशा पूर्णपणे संपलेल्या नाहीत, कारण यावेळी आणखी दोन भारतीय चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आहेत. ते कोणते चित्रपट आहेत जाणून घेऊयात.

एकीकडे आमिर खान आणि किरण राव यांच्या चित्रपटाने ऑस्करमध्ये(Oscar) निराशा केली तर दुसरीकडे शॉर्ट फिल्म कॅटेगरीत भारताचे नाव अजूनही चमकताना दिसत आहे. UK मधून शॉर्टलिस्ट केलेला ‘संतोष’ हा चित्रपट भारताच्या कथेवर आधारित असला तरी तो ब्रिटनचे प्रतिनिधित्व करणारा चित्रपट म्हणून ऑस्करपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय ‘अनुजा’ या भारतीय लघुपटानेही यंदाच्या ऑस्करच्या लघुपट श्रेणीत स्थान मिळवले आहे. या चित्रपटाची कथा एका भारतीय मुलीवर आधारित असून इंडो-अमेरिकन प्रोडक्शन अंतर्गत त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

‘संतोष’ चित्रपटात शहाना गोस्वामी मुख्य भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट ब्रिटिश-भारतीय चित्रपट निर्मात्या संध्या सुरी यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपट शॉर्टलिस्ट झाल्यानंतर शहाना गोस्वामीने इंस्टाग्रामवर आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, ’85 चित्रपटांपैकी आमचा चित्रपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाला ही अभिमानाची गोष्ट आहे.’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संध्या सुरी यांचे देखील अभिनेत्रीने आभार मानले.

‘अनुजा’ या दुसऱ्या शॉर्ट फिल्मचे निर्मातेही यावेळी आनंदी झाले आहेत. त्यांना चित्रपटातील कलाकार सजदा पठाण आणि अनन्या शानभाग यांचा अभिमान आहे. या चित्रपटाचेही खूप कौतुक झाले असून भारतीय वंशाची प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री मिंडी कॉलिंग हिनेही ‘अनुजा’चे कौतुक केले आहे. हा चित्रपट देखील प्रेक्षकांना आवडला आहे.

आता ‘संतोष’ आणि ‘अनुजा’ मधला कोणता चित्रपट ऑस्कर ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. एकीकडे ‘संतोष’ची टीम आनंदाने उड्या मारत असताना, दुसरीकडे ‘अनुजा’च्या निर्मात्यांनाही त्यांच्या कामाचे जगभरात कौतुक होईल अशी आशा आहे. भारतासाठी हा मोठा क्षण असू शकतो, कारण या दोन्ही चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. आता नक्की कोणता चित्रपट ऑस्कर २०२५ मध्ये बाजी मारतो हे पाहणे उत्कंठाचे होणार आहे.

हेही वाचा :

महायुती सरकारच्या खातेवाटपाचं अखेर ठरलं?; ‘हा’ मोठा बदल केला जाणार

खळबजनक! १५ वर्षीय मुलाची हत्या; शरीराचे १७ तुकडे करून जमिनीत पुरले

पोटावर वाढलेली चरबी आणि वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतील ‘ही’ हिरवी पाने, नियमित करा सेवन