भारताला धक्का, टीम इंडिया 180 धावांवर ऑलआऊट…

बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना ॲडलेड येथे आजपासून सुरु झाला आहे. या मालिकेचा पहिला सामना गमावल्यानंतर ऑस्टेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत(Team India) भारतीय संघाचा बॅकफूटवर नेले आहे. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ 44.1 षटकात 180 धावा करून गडगडला.

या डे- नाईट कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र(Team India) भारतीय संघाची सूरूवात खूपच खराब झाली. मिचेल स्टार्कने सामन्याच्या पहिल्या चेंडूवर सलामीवीर यशस्वी जैस्वालला एलबीडब्ल्यू बाद केला त्यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिलने भागीदारी करत भारताची धावसंख्या 69 धावांपर्यंत नेली. मात्र त्यानंतर 37 धावा करून केएल राहुल आऊट झाला. त्यानंतर काहीच वेळात भारतीय संघाने शुभमन गिल आणि विराट कोहलीची विकेटही गमावली. गिल 31 तर विराटला 7 धावा करता आल्या.

चहानंतर रोहित शर्मा, ऋषभ पंत बाद झाले. त्यानंतर नितीश रेड्डीने शानदार खेळी करत भारतीय संघाला 180 धावांपर्यंत नेले. ऑस्टेलियाकडून मिचेल स्टार्कने 48 धावांत 6 विकेट घेतल्या तर पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँडने 2-2 विकेट घेतल्या. स्टार्कने डे- नाईट कसोटी सामन्यात तिसऱ्यांदा 5 हून अधिक विकेट घेतले तर कसोटीत 15व्यांदा एका डावात 5 पेक्षा जास्त विकेट मिचेल स्टार्कने घेतले आहे.

या सामन्यात भारतीय संघ तीन बदलांसह उतरला आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी रविचंद्रन अश्विन, देवदत्त पडिक्कलच्या जागी शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलच्या जागी रोहित शर्मा संघात परतला आहे. तर बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

हेही वाचा :

अभ्यास सोडून तरुणीच्या डोक्यातील काढतोय उवा; Viral Video

लग्नानंतर पहिल्यांदाच दिसले नागा चैतन्य आणि शोभिता, Video Viral

गृहमंत्रिद कुणाला मिळणार, पहिल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य!