भारतीय क्रिकेट (Cricket)संघाकडून खेळलेला करुण नायर सध्या चर्चेत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये करुण सध्या धुमाकूळ घालत आहे. नायरने ५० षटकांच्या या स्पर्धेत आतापर्यंत पाच शतके झळकावली आहेत. आता त्याचा संघ गुरुवारी उपांत्य फेरीत महाराष्ट्रासमोर आहे. याशिवाय बीसीसीआयही करुण नायरवर नजर ठेवून असल्याचे वृत्त आहे.
नायर निवडकर्त्यांच्या रडारवर आहे. अशा परिस्थितीत नायर आठ वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. करुण नायरचे कसोटी (Cricket)क्रिकेटमध्ये त्रिशतक आहे. मात्र, त्यानंतर लगेचच त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले, त्यानंतर तो अद्यापपर्यंत पुनरागमन करू शकलेला नाही. आता करुणने एक मोठा खुलासा केला आहे.
टीम इंडियाला या वर्षी जूनमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. नायरचा फॉर्म असाच सुरू राहिल्यास तो इंग्लंडचे विमान पकडू शकतो. भारतीय खेळाडूला काऊंटीचाही अनुभव आहे. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्याने कांउटीमध्येही शतक झळकवले आहे.
KARUN NAIR
— Jonnhs. (@CricLazyJonhs) January 14, 2025
– Karun Nair is all set to play county cricket!
– The talented Indian batter is ready to showcase his skills on English soil. pic.twitter.com/gClIHBmSoJ
करुणने काऊंटी क्रिकेटचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, “हा खरोखरच एक अद्भुत अनुभव होता. इंग्लंडमध्ये खेळणे सोपे नाही. २०१८ मध्ये मी भारत अ साठी काही सामने खेळले आणि मी चांगली कामगिरी केली.”
करुण नायर म्हणाला,” मी भारत अ संघासाठी तीन सामन्यांत दोन अर्धशतके झळकवली त्यामुळे मला परत जाऊन काऊंटी क्रिकेट खेळायचे होते कारण तुम्ही दरवर्षी कांउटी क्रिकेटबद्दल बरेच काही ऐकता. त्यामुळे २०१८ पासून मी काउंटी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत होतो पण मला कधीच संधी मिळाली नाही.
जेव्हा अचानक २०२३ मध्ये नॉर्थम्प्टनशायरसाठी ३ सामने खेळण्याची संधी मिळाली. हंगामातील शेवटच्या तीनमध्ये, आणि तेही काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन १ च्या सर्वोत्तम ३ संघांविरुद्ध. ही संधी मी दोन्ही हातांनी स्वीकारली. “
” पहिल्या डावात जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा मला जाणवले की इथे खेळणे किती कठीण आहे. मला फक्त तिथे राहायचे होते, खेळ शिकायचा होता आणि त्या परिस्थितीचा अनुभव घ्यायचा होता. असंच झालं आणि ओव्हलवर शतक झळकावणं, त्या बाल्कनीत उभं राहणं हे माझ्यासाठी आयुष्याचं पूर्ण वर्तुळ होतं.
काही वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये मी तिथे उभा राहून विचार करत होतो की, ‘आता काय झालं आणि २०२३ मध्ये परत जाऊन पाच वर्षांनंतर शतक झळकावायचं आणि त्याच बाल्कनीत उभं राहायचं. मला वाटते की भावना, तुम्हाला समजू शकतात. ” करुण नायर पुढे म्हणाला.
हेही वाचा :
तपास यंत्रणा ॲक्शन मोडवर वाल्मीक कराडला मोक्का लावला
दारात मांडव, हातावरची मेहंदी रंगली, लग्न तोंडावर अन जन्मदात्या बापाने मुलीला संपवलं? कारण…
‘या’ राशीच्या लोकांना शशी आणि पुष्य योगाचा होणार लाभ