भारतीय क्रिकेटर्सची हळहळ अन् संताप! थेट इशारा देत म्हणाले, ‘याची किंमत…’

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला असून यात दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष केले. या दहशतवादी हल्ल्यात एकूण 26 लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर क्रिकेट जगतातील अनेक स्टार क्रिकेटर्सनी(cricketers) रोष व्यक्त करत या ‘हल्ल्याचा बदला भारताने घ्यायला हवा, हे कृत्य करणाऱ्यांना शिक्षा करण्यात यावी’ अशी मागणी केली आहे.

भारताचे स्टार क्रिकेटर्स(cricketers) पार्थिव पटेल, गौतम गंभीर, हरभजन सिंह, आकाश चोप्रा, शुभमन गिल, नमन धीर, राजस्थान रॉयल्स इत्यादींनी सोशल मीडियावरून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेद व्यक्त करून पोस्ट लिहिली. भारताचा माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाचा हेड कोच असलेल्या गौतम गंभीरने या घटनेची निंदा करत लिहिले की, ‘दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबासाठी मी प्रार्थना करतो. यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांना याची किंमत चुकवावीच लागेल. भारत नक्कीच प्रहार करेल’.

भारताचा माजी क्रिकेटर पार्थिव पटेल याने एक्स अकाउंटवरून ट्विट केले की, ‘आज काश्मीरमध्ये जे काही झाले ते ऐकून मी स्तब्द आणि क्रोधीत झालोय. यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना शिक्षा मिळेल. मला खात्री आहे की त्यांना शिक्षा मिळेल. यात मारल्या गेलेल्या लोकांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करेन’.

माजी दिग्गज गोलंदाज हरभजन सिंह याने लिहिले की,’ या क्रूर हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या सर्व कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. त्यांना माफ केले जाणार नाही’.

भारताचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल म्हणाला की, ‘पहलगाममधील हल्ल्याबद्दल ऐकून मन दुखावले. माझ्या प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. अशा हिंसाचाराला आपल्या देशात स्थान नाही’.

हेही वाचा :

वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्ता करा हेल्दी टेस्टी कोथिंबीरीचे सूप

पुतण्या काकांची भेट! मनोमिलन शक्य अन् अशक्यही; महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय?

महाराष्ट्रासाठी वाईट बातमी, दहशतवादी हल्ल्यात पुणे, डोंबिवली, पनवेलचे पर्यटक मृत्यूमुखी…