भारताचा परकीय चलन साठा उच्चांकावर, 692.30 अब्ज डॉलरचा नवा विक्रम

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (economic news) एक नवीन मोलाची घडामोड समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) अहवालानुसार, भारताचा परकीय चलन साठा 692.30 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणखी एक उच्चांक नोंदवला गेला आहे.

परकीय चलन साठ्यात 2.84 अब्ज डॉलरची वाढ

20 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात 2.84 अब्ज डॉलरने वाढ झाली. या वाढीमुळे साठ्याची एकूण रक्कम 692.30 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या आठवड्यातही 223 दशलक्ष डॉलरची वाढ होऊन साठ्याने 689.46 अब्ज डॉलरचा उच्चांक गाठला होता.

सोन्याच्या साठ्याचे मूल्य वाढले

आरबीआयच्या माहितीनुसार, सोन्याच्या साठ्याचे मूल्य देखील 726 दशलक्ष डॉलरने वाढले आहे आणि सध्या 63.61 अब्ज डॉलर झाले आहे. त्याचबरोबर, स्पेशल ड्रॉइंग राइट्स (एसडीआर) 121 दशलक्ष डॉलरने वाढून 18.54 अब्ज डॉलरवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील (आयएमएफ) भारताचा साठा मात्र 66 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 4.46 अब्ज डॉलर झाला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत

हा विक्रम भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठे आश्वासन आहे, कारण परकीय चलनाचा साठा मजबूत असणे देशाच्या आर्थिक स्थैर्याचे प्रतीक मानले जाते.

हेही वाचा:

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.

‘मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला…,’ भारताच्या दिग्गज खेळाडूचं विधान

शिरोळमध्ये राजकारण रंगणार; निवडणुकीच्या रिंगणात कोण बाजी मारणार?