कोल्हापूर : गर्भपातासाठी बाजारात असलेल्या गोळ्यांची विक्री(birth control pills) करणे सहजासहजी शक्य नाही. त्यासाठी संबंधित डॉक्टरांनी तीन प्रिस्क्रिप्शन द्याव्या लागतात. त्याच्या नोंदी डॉक्टर, औषध विक्रेता आणि मुख्य विक्रेता यांच्याकडे असतात. तरीही यासर्व यंत्रणा धुडकावून बिनदिक्कत गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री होत असल्याचे नुकतेच करवीर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दिसून आले.
याबाबत अधिक माहिती घेतली असता हे रॅकेट(birth control pills) थेट परराज्यातून डॉक्टरापर्यंत पोहोचत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मूळ विक्रेता बाजूला ठेवून यांची विक्री होत असल्याची माहिती पुढे येते. राज्यात सर्वाधिक मुलींच्या जन्माचा दर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात होता. त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी पुढाकार घेतला. पोलिस, आरोग्य यंत्रणेसोबत महसूलमधील अधिकारीदेखील सक्रिय झाले आणि पाहता पाहता हे रॅकेट उद्ध्वस्त झाले. त्यामुळेच दहा वर्षांपूर्वी मुलींच्या जन्मदरात किंचित वाढ झाली.
पुढे अधिकारी बदलले आणि ‘लेक वाचवा’ अभियान मागे पडले. त्यामुळे गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळ्या मोकाट सुटल्याचे दिसून येते. पोलिसांकडून होणारी कारवाईसुद्धा आता कमी पडत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील गर्भलिंग निदान आणि गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या विक्रीच्या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. कारण, अधिकृत गर्भपात करता येतो, त्यासाठी ठोस कारण असावे लागते.
ठरावीक हॉस्पिटलना याची परवानगी आहे. त्यासाठी आवश्यक गोळ्यांची विक्रीही नोंदणी करून होते. त्यावर औषध प्रशासनाचा वॉच असतो. तरीही कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री खुलेआम होत असल्याचे करवीर पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले आहे.
सध्या बाजारात खुलेआम विक्री होत असलेल्या गर्भपाताच्या गोळ्या या थेट परराज्यातून कोल्हापुरात येत असल्याचे सांगण्यात येते. या गोळ्यांची विक्री कोणत्याही अधिकृत विक्रेत्यांकडून होत नाही. यासाठी परराज्यातील विक्रेते थेट डॉक्टरांशी संपर्कात येतात आणि कोणत्याही नोंदीशिवाय या गोळ्यांची विक्री होते. ही विक्री जोपर्यंत थांबविली जात नाही तोपर्यंत अनधिकृत गर्भपात टाळणे शक्य नाही.
हेही वाचा :
12वी नंतर पुढे काय करायचं? वाचा करिअरच्या संधी
सांगली हादरलं! प्रवासी बॅगेत पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
सचिन तेंडुलकरचा मुलगा देवदर्शनासाठी कोल्हापुरात; नृसिंहवाडीतील श्री दत्त महाराजांचं घेतलं दर्शन