सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला महागाईचा फटका; पालेभाज्याही महागल्या

पिंपरी आणि परिसरातील भाजीपाला(vegetables) बाजारात गेल्या काही दिवसांपासून दरवाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे ग्रामीण भागातून होणारी भाजीपाल्याची आवक घटल्याने, विशेषतः पालेभाज्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला महागाईचा फटका बसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे टोमॅटोचे दर मात्र काही प्रमाणात खाली आले आहेत.

उन्हाच्या तडाख्याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या(vegetables) उत्पादनावर आणि पुरवठ्यावर झाला आहे. आवक कमी झाल्याने पालेभाज्यांचे दर गेल्या महिन्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहेत. उदाहरणार्थ, मेथीची जुडी जी पूर्वी १५ रुपयांना मिळत होती, ती आता किरकोळ बाजारात २५ रुपयांना विकली जात आहे. कोथिंबिरीची जुडीही १५ रुपयांवरून २० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. शेपू, पालक यांचे दरही वाढले आहेत.

दुसरीकडे, मागील आठवड्यात १०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेले टोमॅटोचे दर आता लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. आवक वाढल्याने घाऊक बाजारात दर २५-२७ रुपये किलोवर आले असून, किरकोळ विक्री ३०-४० रुपये किलोने होत आहे. कांद्याचे दर किरकोळ बाजारात ४०-४५ रुपये प्रति किलोवर स्थिर आहेत, तर लसणाचे दर १०० रुपये प्रति किलोवर कायम आहेत.

पिंपरी भाजीपाला बाजार समितीचे व्यापारी आबासाहेब रायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याचे किरकोळ बाजारातील प्रमुख भाज्यांचे प्रति किलो दर खालीलप्रमाणे आहेत: ढोबळी मिरची ₹६०-८०, वांगी ₹६०, कारली ₹६०, मिरची /दोडका ₹८०, फ्लॉवर ₹४०, कोबी ₹३०, काकडी ₹४०, बटाटा ₹२५, भेंडी ₹८०, गाजर ₹८०, शेवगा ₹८०, तोंडली ₹८०.

पालेभाज्यांचे प्रति जुडी किरकोळ दर असे आहेत: मेथी २५, पालक ₹२०, शेपू ₹२०, कांदापात ₹३०, मुळा ₹३०, पुदिना ₹१५, लालभाजी ₹२०. एकूणच, वाढत्या उन्हामुळे भाजीपाल्याची आवक घटल्याने दरवाढ झाली असून, टोमॅटो वगळता इतर भाज्यांसाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

हेही वाचा :

मोठी बातमी! अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; आरोपीला कुरूंदकरला जन्मठेपेची शिक्षा

‘ठाकरे एकत्र येणार की नाही हे रश्मी ठाकरेंच्या इच्छेवर…’, खळबळजनक विधान करत नितेश राणे म्हणाले…

मुलीच्या लग्नात बायकोसह अरविंद केजरीवाल यांनी मारला ठुमका Video Viral