“माझ्यावरती अन्याय झाला…”, तेजस्विनी पंडीतकडून राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ शेअर

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत(political news) कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. शिवाय सोशल मीडियावर आपली राजकीय मतं बिनधास्तपणे मांडत असते. सोशल मीडियावर तेजस्विनीची जबरदस्त फॅन फाॅलोइंग पहायला मिळते.

आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान, तेजस्विनीने(political news) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या या पोस्टची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

तेजस्विनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये “माझ्यावरती अन्याय झालाय हे माझ्याशी तरी कुणी बोलायचं नाही,” असं राज ठाकरे म्हणताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या या शब्दांनंतर व्हिडीओत त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे काही फोटो पहायला मिळत आहेत.

व्हिडीओमध्ये बोलत असताना राज ठाकरे म्हणाले की, मी कधी माझ्या चेहऱ्यावर भासू दिलं का रे, की माझ्या बाबतीत काय चाललंय? कसले हेवेदावे घेऊन बसलात रे तुम्ही, कुठे घेऊन जाणार आहात ती भांडणं?

लोकांना अशी भांडणारी, कुंठत राहणारी अशी माणसं आवडत नाही. त्यामुळे माझ्यावरती अन्याय झालाय हे माझ्याशी तरी कुणी बोलायचं नाही, असं ते या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. तेजस्विनीने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, पाऊल थकलं नाही, निःशब्द. तेजस्विनीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा :

विनोद तावडेंची बॅग कोण तपासणार? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल

टिकटॉक स्टार इम्शा रहमानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS लीक

एकनाथ शिंदेंचा हा माणूस पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो; संजय राऊत