सकाळच्या नाश्त्यामध्ये (breakfast)लहान मुलांसाठी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. अशावेळी अनेकदा मुलांना बाहेरून विकत आणलेले पदार्थ नाश्त्यामध्ये दिले जातात. पण सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे मुलं लगेच आजारी पडतात. त्यामुळे मुलांना सतत बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खायला देऊ नये.
आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी(breakfast) बटाटा पोहा टिक्की कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. तसेच बटाटा पोह्याची टिक्की लहान मुलं आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया बटाटा पोहा टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी
साहित्य:
- पोहे
- कोथिंबीर
- तीळ
- काळीमिरी
- जिरे
- कसुरी मेथी
- लाल तिखट
- हळद
- मीठ
- उकडलेला बटाटा
- बारीक चिरलेला कांदा
- तेल
- गरम मसाला
कृती:
- बटाटा पोहा टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम पाण्यात 5 मिनिटं पोहे भिजत ठेवा. पोहे भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या.
- उकडलेल्या बटाट्याची साल काढून त्यात भिजवलेले पोहे, मीठ आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या.
- त्यानंतर त्यात तीळ, काळीमिरी पावडर, जिरे, कसुरी मेथी, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला टाकून मिक्स करून घ्या.
- तयार मिश्रणाच्या तुम्हाला हव्या त्या आकाराच्या टिक्की बनवून घ्या.
- टिक्की तळण्यासाठी तेल गरम करा. गरम तेलात टिक्की टाकून दोन्ही बाजून व्यवस्थित भाजून घ्या.
- तयार आहे बटाटा पोहा टिक्की. ही टिक्की तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता.
हेही वाचा:
पोलिसांची ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ संकल्पना: ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना
महायुतीच्या मंत्र्याकडून एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी गणरायाला साकडे
राहुल गांधींचे देश जोडणारे काम, भाजपाला लोकसभेत जनतेने दिले उत्तर; आता पुढे काय?: रमेश चेन्नीथला