राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट

देशात सध्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसाने(districts) कहर केला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 30 वर पोहोचली आहे. याचबरोब दिल्ली-एनसीआरमध्येही पावसानं धुमाकूळ घातला आहे.

अशात महाराष्ट्रात सध्या काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी (districts)ऊन असं वातावरण दिसून येतंय. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व मध्य बंगालचा उपसागर व लगतच्या भागावर वाऱ्याची एक चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्याच्या प्रभावाखाली आज 29 ऑगस्टरोजी उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

याचा परिणाम म्हणून दक्षिण गुजरात ते मध्य केरळ किनारपट्टीवर तसेच राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच ते सात दिवस मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात देखील अनेक भागात सध्या ढगाळ वातावरण असून काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच, पुणे व सातारा येथील घाट विभागात पुढील चार ते पाच दिवस तर कोल्हापुर येथे आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातही अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे.सोलापूर, हिंगोली ,नांदेड ,लातूर व धाराशिव येथे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

पुणे व आजूबाजूच्या परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. आज 29 ऑगस्ट व 30 ऑगस्टरोजी आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

मालवणचा राजकोट आणि राजकारण्यांचा येळकोट!

“सरकार उलथवून टाकण्यासाठी एकत्र या”: उद्धव ठाकरे यांचे सरपंचांना आवाहन

क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठी घसरण: बिटकॉइन, इथेरियम, डॉजक्वाइनमध्ये 5% पेक्षा जास्त घट