केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मुलींच्या (Invest)भविष्याची आणि त्यांच्या लग्नाची चिंता प्रत्येक आईवडिलांना असते. त्यामुळे तुम्ही मुलगी लहान असतानाच वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करा. मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजनासुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सर्वाधिक परतावा मिळतो. सर्वात जास्त परतावा हा सुकन्या समृद्धी योजनेत मिळतो. याचसोबत टॅक्स बेनिफिटदेखील मिळतात. या योजनेत ८.२ टक्के व्याजदर मिळते.

सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही लेक लहान असल्यापासून ते तिच्या लग्नापर्यंत पैसे गुंतवू शकतात. या योजनेत तिमाही आधारावर ८.२ टक्के व्याजदर मिळते.या योजनेत १० वर्षांपेक्षा (Invest)कमी वयोगटातील मुलींच्या नावाने खाते उघडू शकतात. या योजनेत तुम्हाला १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. म्हणजेच तुमची मुलगी जर ५ वर्षांची असेल तर मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत गुंतवणूक करु शकतात. तुम्ही या योजनेत २५० ते १.५० लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात.
सुकन्या समृद्धी योजनेतर जर तुम्ही वर्षाला १.५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला ७० लाख रुपये मिळणार आहे. यासाठी तुम्हाला महिन्याला १२५०० रुपये गुंतवायचे आहेत. त्यासाठी दिवसाला (Invest) ४१६ रुपये बाजूला काढून ठेवा. यामुळे तुम्ही मॅच्युरिटीनंतर ६९.८ लाख रुपये मिळवू शकतात.या योजनेत कलम ८० सी अंतर्गत १.५ लाखांवर कर सवलत मिळते.
हेही वाचा :
‘महिलेच्या गालाला, शरिराला हात लावणं म्हणजे…’; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
भारतीय संघ अडचणीत, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा कर्णधार बदलणार?
राणीसारखं आयुष्य जगतेय प्रियांका चोप्रा; संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल