जीएसएम फॉईल्सच्या आयपीओमध्ये 28 मेपर्यंत गुंतवणुकीची संधी

एसएएम सेगमेंटमधील जीएसएम फॉईल्सचा(investment) आयपीओ 24 मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आणि या आयपीओमध्ये 28 मेपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या इश्यूमधून कंपनी 11.01 कोटीचा फंड उभारणार आहे. शेअर्सच्या अलॉटमेंटची संभाव्य तारीख 29 मे आहे आणि लिस्टिंगची संभाव्य तारीख 31 मे आहे. श्रेणी शेअर्स लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत आणि बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे रजिस्ट्रार आहेत.

जीएसएम फॉइल्स(investment) लिमिटेडचा आयपीओ हा एक फिक्स्ड प्राईस इश्यू आहे. हा इश्यू 34.4 लाख शेअर्सचा फ्रेश इश्यू आहे ज्याद्वारे कंपनीचे 11.01 कोटी उभारण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनी 32 रुपये प्रति शेअर दराने आपले शेअर्स ऑफर करत आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार एका लॉटमध्ये 4000 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूक रक्कम 1 लाख 28 हजार रुपये आहे.

एप्रिल 2019 मध्ये स्थापन झालेली जीएसएम फॉइल्स लिमिटेड ब्लिस्टर फॉइल्स आणि ॲल्युमिनियम फार्मा फॉइल्स तयार करते, ज्यांना “स्ट्रिप फॉइल्स” असेही म्हणतात. हे कॅप्सूल आणि टॅब्लेट सारख्या फार्मास्युटिकल औषधांच्या पॅकेजिंगसाठी वापरले जाते.

हे फॉइल हे प्राथमिक पॅकेजिंग मटेरियल असल्याने जे औषधाच्या थेट संपर्कात येते, त्यामुळे गुणवत्तेची अत्यंत काळजी घेतली जाते. कंपनीची महाराष्ट्रातमधील मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी टूल्स, मशीनरी आणि सुविधांनी सुसज्ज आहे ज्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, प्रोडक्शन, टेस्टिंग, रिसर्च, स्टोरेज आणि पॅकेजिंग कोणत्याही अडचणी आणि अडथळ्यांशिवाय पूर्ण होते. कंपनी आयएसओ 9001:2015 प्रमाणित आहे.

आयपीओमध्ये, सुमारे 50% ऑफर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित 50% गैर-किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. आयपीओमधून मिळणारे निव्वळ उत्पन्न प्लांट आणि मशिनरी खरेदीसाठी, खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कंपनीने वापरण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या कालावधीत कंपनीचा महसूल 27.17 कोटी होता आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स 1.24 कोटी होता.

नोंद – म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

हेही वाचा :

जान्हवी कपूरने होणाऱ्या सासूबाईंसाठी घेतला मोठा निर्णय, पोस्ट तुफान व्हायरल

पंतप्रधान मोदींच्या ‘या’ बालेकिल्ल्यात काँग्रेस करणार जोरदार शक्तिप्रदर्शन!

पुणे अपघाताने राजकीय वातावरण तापलं; मुश्रीफांची धंगेकरांना ‘वॉर्निंग’!