जेव्हा जेव्हा ॲपलचा फोन(iphone) लाँच होतो तेव्हा तो टेक इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा सर्वात मोठा विषय बनतो. यावेळी Apple कंपनी iPhone 16 सिरीज 9 सप्टेंबर 2024 रोजी लाँच करणार आहे. आता या फोनच्या लाँचिंगला काही दिवस उरले आहेत, मात्र या फोनची किंमत जाणून घेण्यासाठी लोक आधीच उत्सुक आहेत.
iPhones खूप महाग आहेत, म्हणून लोकांना हे देखील जाणून घ्यायचे आहे की कोणत्या देशात iPhone 16 सर्वात स्वस्त मिळत आहे. आयफोन 16 लाँच झाल्यानंतर सर्वात कमी किमतीत कोणत्या देशात विकला जाईल. तर आज आपण जाणून घेऊयात आयफोन 16 ची किंमती वेगवेगळ्या देशांमध्ये किती आहेत.
आयफोनची(iphone) किंमत जपानमध्ये सर्वात कमी आहे. जपानमध्ये कमी कर आणि इतर शुल्कांमुळे आयफोन 16 ची किंमत अमेरिकेपेक्षा 17.9% कमी असू शकते. जपानमध्ये iPhone 16 ची किंमत अंदाजे 70,705 रुपये असू शकते, जी इतर देशांच्या तुलनेत खूपच परवडणारी असेल.
यानंतर आयफोन 16 अमेरिकेतही खूप स्वस्त असू शकतो. आपल्या देशांतर्गत बाजारातही Apple सर्वात कमी किमतीत iPhone 16 विकू शकते. आयफोन 16 हा फोन USA मध्ये सुमारे 67,106 रुपयांना विकला जाऊ शकतो. असे झाल्यास आयफोन 16 अमेरिकेत जपानपेक्षा स्वस्त होईल.
iPhone 16 खरेदी करण्याचा तिसरा स्वस्त पर्याय दुबई असू शकतो, जिथे त्याची किंमत सुमारे 73,237 रुपये असू शकते. तर भारतात iPhone 16 ची किंमत जवळपास 80,000 रुपये असू शकते. भारतानंतर चीनमध्ये या फोनची किंमत जवळपास 82,560 रुपये असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
हॉर्नच्या आवाजावर लहान मुलांनी केला डान्स: Video Viral
मनोज जरांगे आणि राजेंद्र राऊत यांमध्ये तीव्र वाद; फडणवीसांवर गंभीर आरोप
विधानसभा: काँग्रेस मंत्र्यांच्या विधानावर भाजपा आमदारांचा जल्लोष,