धनंजय मुंडेंचा पक्षातूनच गेम होतोय ?; पालकमंत्रीपद लांबच राहिलं आता मंत्रिपदही जाणार?

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख(latest political news)हत्याप्रकरणात विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या वाल्मिक कराड यांनी पुण्यात सीआयडीसमोर सरेंडर केलं होतं. वाल्मिक कराड हे राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे याप्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे.

बीडच्या प्रकरणावरून पालकमंत्रीपद(latest political news) त्यांच्यापासून दूर जात असल्याची चर्चा सुरू असताना आता त्यांना मंत्रिपदही सोडावे लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्याविरोधात पक्षातच नाराजी वाढत असल्याचं म्हटलं जात आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर पक्षातील वरिष्ठ नेते नाराज आहेत. धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरण व्यवस्थित हाताळल नसल्याचं पक्षातील वरिष्ठ नेत्यांच मत आहे. मस्साजोग प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत असल्याची भावना पक्षाच्या नेत्यांमध्ये तयार झाली आहे.

आपल्या पक्षाच्या मंत्र्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप होत असताना अजित पवार या सगळ्यावर काहीतरी भूमिका मांडतील असे अपेक्षित होते. मात्र, अजित पवार यांचे सध्याच्या काळातील मौन सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

अजित पवार सध्या नववर्षानिमित्त परदेशात असल्याची माहिती आहे. परदेशातून परत आल्यानंतर अजित पवार हे या विषयावर बोलतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

नव्या वर्षात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का…

सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा खळबळजनक खुलासा, भर कार्यक्रमात म्हणाली ‘तो मला खूप…’

हॉर्न वाजवल्याने गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरला शिवीगाळ, तुफान राडा; दुकानांची जाळपोळ