चहामुळे वाढतोय पित्त, अ‍ॅसिडिटीचा त्रास? मग चहा बनवताना मिक्स करा ‘हा’ १० रुपयांचा पदार्थ

भारतासह इतर सर्वच देशांमध्ये असंख्य चहाप्रेमी(tea) आहेत. भारतामध्ये चहा पिणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. सर्वच भारतीयांची सकाळ चहा किंवा कॉफी पिऊनच होते. अनेकांना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा पिण्याची सवय असते. चहा प्यायल्यानंतर संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. मात्र रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यामुळे पित्त आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे रिकाम्या पोटी चहाचे सेवन करू नये.

अ‍ॅसिडिटी, पित्त, अपचन किंवा गॅसची समस्या वाढल्यानंतर कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चहा(tea) बनवताना कोणते पदार्थ मिक्स केल्यास अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवणार नाही, याबद्दल सांगणार आहोत. या पदार्थांमुळे चहाची चव सुद्धा वाढेल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील.

आलं:
चहा बनवताना चहामध्ये आलं टाकल्यास चहाची चव वाढेल आणि आरोग्यालासुद्धा अनेक फायदे होतील. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्यासाठीअतिशय पौष्टिक आहेत. शिवाय यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होऊन आराम मिळतो. आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे पचनक्रिया शांत होते. सकाळच्या वेळी आलं टाकून बनवलेल्या चहाचे सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास होणार नाही.

बडीशेप:
जेवल्यानंतर बडीशेप खायला सगळ्यांचं आवडते. बडीशेप खाल्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि आरोग्यालासुद्धा फायदे होतात. बडीशेप खाल्यामुळे जेवलेले अन्नपदार्थ पचन होण्यास मदत होते. सकाळच्या वेळी घरात चहा बनवताना तुम्ही त्यात चिमूटभर बडीशेप टाकल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास होणार नाही. यामुळे चहाचा सुगंध वाढेल.

वेलची:
अनेक घरांमध्ये चहा बनवताना मसाला वेलचीचा नियमित वापर केला जातो. शिवाय सर्वच गोड पदार्थ बनवताना वेलचीचा वापर केला जातो. वेलची वापरल्यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढण्यास मदत होते. वेलचीचा चहा प्यायल्यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवत नाही. त्यामुळे सकाळच्या वेळी किंवा इतर वेळी चहा बनवताना त्यात वेलची टाकावी.

लवंग:
प्रत्येक स्वयंपाक घरात लवंग हा पदार्थ असतोच. चहामध्ये तुम्ही लवंग टाकू शकता. यामुळे चहाची चव वाढेल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. शिवाय या चहामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे सर्दी खोकल्याची समस्या कमी होते. साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी लवंग चहाचे संबं करावे.

तुळस:
मागील अनेक वर्षांपासून आरोग्यासंबंधित गंभीर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीच्या पानांचे सेवन केले जाते. तुळशीच्या पाण्यात असलेले गुणधर्म शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे चहा बनवताना तुम्ही त्यात दोन किंवा तीन तुळशीची पाने टाकू शकता. यामुळे चहाचा सुगंध आणि चव वाढेल.

हेही वाचा :

HSSC मध्ये ‘या’ अंतर्गत मिळणारे 5 गुण होणार बंद

“ट्रेलर रिलीज करा, नाहीतर…”, राम चरणच्या चाहत्याने ‘गेम चेंजर’ चित्रपटाबद्दल निर्मात्यांना दिली धमकी

घाईगडबडीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी टेस्ट ब्रोकली बीटरूट सॅलड