सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहतंय का?; रोहित पवारांचा संतप्त सवाल, म्हणाले, अजितदादांनी…

बीड आणि परभणी दोन्ही प्रकरणात तपास एका पॉइंटला येऊन थांबला असून तपास आता गती घ्यायला तयार नाही. बीड प्रकरणात सभागृहात मुख्यमंत्र्यांनी (government)न्यायालयीन तपासणी करण्याची घोषणा करुन 25 दिवस झालेत पण अद्यापही समिती कार्यान्वित होऊ शकलेली नाही. सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहत आहे का?, असा सवाल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

विष्णू चाटे या आरोपीचा मोबाईल सापडला तर सर्वकाही समोर येणार आहे, परंतु या आरोपीचा मोबाईल अजूनही सापडत नाही. विरोधकांचे फोन क्षणार्धात टॅप करू शकणाऱ्या यंत्रणेला आरोपीच्या मोबाईलचा साधा सीडीआरसुद्धा का मिळत नाही? हे पोलीस यंत्रणेचे आणि पर्यायाने गृहमंत्र्यांचे अपयश नाही का?, असंही रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांनी एक्स वर पोस्ट करत सदर प्रकरणावर भाष्य केलं आहे.

राज्यकर्त्यांनी (government)मिळमिळीत भूमिका बघता जनतेचा कायदा सुव्यवस्थेवरचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आपली कार्यक्षमता तर आजित पवारांनी आपला निडरपणा दाखवायला हवा.

वजीराच्या बेशिस्त प्याद्याला वाचवण्यासाठी राजानेच कायद्याची मोडतोड करून संपूर्ण राज्यालाच वेठीस धरायचे नसते आणि ते राज्याच्या हिताचेही नसते, याचे स्मरण मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी ठेवायला हवे, असंही रोहित पवार म्हणाले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्येच्या तपासासाठी 1 जानेवारीला नेमलेली एसआयटी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सात जणांची एसआयटी स्थापन करण्यात आलीय. पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेलीच या नव्या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत.

आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबाचा आक्षेप होता. या घटनेतील आरोपी एसआयटीतील अधिकाऱ्यांच्या संपर्कातील होते, असाही आरोप देशमुख कुटुंबाकडून करण्यात आला होता. त्याचमुळे नव्या एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली.

संतोष देशमुखांच्या तपासाला नवीन SIT टीममध्ये कोण कोण?

  • किरण पाटील (अपर पोलिस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर)
  • अनिल गुजर (पोलिस उपअधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड)
  • सुभाष मुठे (पोलिस निरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड)
  • अक्षयकुमार ठिकणे (पोलिस निरीक्षक, भरारी पथक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
  • शर्मिला साळुंखे (पोलिस हवालदार भरारी पथक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
  • दीपाली पवार (हवालदार, सीसीटीएनएस, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

हेही वाचा :

तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत!

राजकारणात मी अनेक वर्षांपासून, अनेकांचे पतंग कापले, पण…; छगन भुजबळ यांचं मोठं विधान!

अरे जनाची नाही तर मनाची तरी! रीलसाठी घोरपडीला बांधून श्वानांपुढे टाकलं; थरकाप उडवणारी दृश्ये Video Viral