उन्हात सतत येणाऱ्या घामामुळे केस खराब झालेत मग मेहेंदीत मिसळा हा पदार्थ

उन्हाळा सुरु झाल्यावर शरीसोबत केसांमध्ये (damaged)सुद्धा घाम यायला सुरुवात होते. घामामुळे केसांचा वास येतो आणि केसांची वाढ थांबते. उन्हाळ्यात तुम्ही केस मोकळे ठेवलेत तर तुमचे केस गळतात. अशा वेळेस तुम्ही मेहेंदीचा वापर करून तुमच्या केसांची शोभा वाढवू शकता. केसांना मेहेंदी लावल्याने अनेक फायदे मिळतात. तसेच केस नैसर्गिक साहित्याचा वापर करून सुंदर दिसतात. पुढे आपण केसांना मेहेंदी लावल्याने मिळणारे फायदे आणि मेहेंदी लावण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ.

बऱ्याच महिला पांढरे केस दिसायला लागले की मेहेंदीचा वापर करतात. मेहेंदी लावल्याने केस काळे भोर, सुंदर आणि चमकदार होतात. शिवाय डोक्याला थंडावा मिळतो. मेहेंदीमध्ये केमिकल्सचा वापर केला जात नाही. त्यामुळे केसांना कोणतीही हानी होत नाही. शिवाय केस मोकळे ठेवणेही (damaged)शक्य होते. मात्र मेहेंदीत काही विशिष्ट गोष्टींचा वापर केल्याने तुमचे केस दाट होऊ शकतात.

मेहेंदी कशी भिजत घालावी?
सगळ्यात आधी १ कप मेहेंदी पावडर घ्या. त्यामध्ये आवळा पावडर, १ चमचा ब्लॅक कॉफी मिक्स करा. पुढे त्यामध्ये कोरा चहा साखर नसलेला आणि आवश्यकतेनुसार कोमट पाणी मिक्स करा. आता एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. मेहेंदीमध्ये पावडरच्या गाठी होऊ देऊ नका. तुमचे मिश्रण तयार आहे.

मेहेंदी केसांना लावताना कोणती काळजी घ्यावी?
आता हे मिश्रण तुम्ही रात्रभर झाकण लावून ठेवून द्या. (damaged)असे केल्याने मेहेंदीमधला रंग पुर्णपणे बाहेर पडतो आणि जास्त काळ टिकतो. मेहेंदी लावताना दुपारची वेळ निवडा. त्याने तुमचे डोके शांत होईल. जेव्हा तुम्ही मेहेंदी लावाल तेव्हा त्यामध्ये एक पदार्थ मिसळा. मेहेंदीच्या पेस्टमध्ये १ चमचा इंडिगो पावडर आणि १ चमचा लिंबाचा रस मिक्स करा. केसांना समान रंग लावा. पॅक २ ते ३ तास ठेवा. मग साध्या पाण्याने केस ,स्वच्छ धुवून घ्या. तर १ दिवसानंतर तुम्ही शॅम्पूने केस धुवू शकता.

हेही वाचा :

इंडियन नेव्ही भरती: SSR मेडिकल असिस्टंट पदासाठी करा अर्ज; येथे करा Apply

बॉयफ्रेंडसोबत बोलण्यासाठी मुलीची आयफोनची मागणी, थेट मनगटच कापलं; मग पुढे जे घडलं… Video Viral

उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा थंड पाणी पिता? शरीरावर होतील अनेक गंभीर दुष्परिणाम

‘श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती रात्रभर…,’ दिग्दर्शकाने पहिल्यांदाच केला खुलासा

खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बंगल्यासमोर जादूटोणा, नारळ, बाहुल्या, लिंबू अन्….