महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा(ceremony) पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतील प्रतिष्ठित आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे.
तसेच राजकीय क्षेत्राव्यतिरिक्त उद्योग, चित्रपट आणि क्रीडा जगतातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नीता अंबानी यांच्यासोबतच बॉलीवडू अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खानही शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.
आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला(ceremony) ४२ हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थित असण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह किमान 10 केंद्रीय मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस आज (5 डिसेंबर) सायंकाळी 5.30 वाजता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्रीही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
शपथविधी सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि राधिका अंबानी यांच्याशिवाय अनंत अंबानी, प्रणय अदानी हे देखील शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. अंबानी कुटुंबाव्यतिरिक्त नोएल टाटा, दीपक पारिख, कुमार मंगलम बिर्ला, अजय पिरामल, उदय कोटक, गीतांजली किर्लोस्कर, मानसी किर्लोस्कर हे देखील या शपथविधी सोहळ्यात उपस्थिती दाखवणार आहेत.
या शपथविधी सोहळ्याला चित्रपट जगताशी निगडित अनेक प्रसिद्ध चेहरेही उपस्थित राहणार आहेत. जसे की, शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित, विकी कौशल, खुशी कपूर, रूपा गांगुली, सिद्धार्थ रॉय, रणबीर कपूर आणि रणवीर सिंग हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, बोनी कपूर आणि एकता कपूर यांच्यासह श्रद्धा कपूर, जय कोटेक, विक्रांत मॅसी आणि जयेश शाह यांचाही समावेश असेल.
भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजली तेंडुलकरसह या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बिरेंद्र सराफ आणि अनिल काकोडकर हे देखील या सोहळ्याचा भाग असणार आहेत.
आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला ४२ हजार लोक उपस्थित आहेत. पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याशिवाय सुमारे 10 केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन आणि जेपी नड्डा यांच्यासह अनेक मंत्री सहभागी होणार आहेत. याशिवाय 19 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या सोहळ्याचा भाग असणार आहेत.
कार्यक्रमात 2 हजार व्हीआयपींसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर 40 हजारांहून अधिक लोकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी चार हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये 3,500 पोलिस आणि 520 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा :
शपथविधीनंतर ‘या’ दिवसपासून सुरू होणार महायुतीचे हिवाळी अधिवेशन
सत्तास्थापनेनंतर पहिला निर्णय ‘लाडकी बहीण योजने’चा ; दीपक केसरकरांनी काय सांगितलं?
आमचं राजकीय करिअर शिंदेंच्या…; उदय सामंत यांचं मोठं विधान