कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : नवी दिल्लीत घडलेल्या निर्भया हत्याकांडानंतर देश पुन्हा(village) एकदा हादरला आहे. तो सुन्न आणि खिन्न झाला आहे. कोलकाता येथील आर जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. तिच्या गळ्यातील स्वर यंत्रापासून ते शरीरातील महत्त्वाच्या अवयवापर्यंत सर्वांची मोडतोड झाली होती. हैवान, सैतान, श्वापद अशी सर्व विशेषणे सौम्य ठरावित किंवा मग वर्णन करण्यासाठी शब्दच सापडू नयेत असा हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा आहे. या घटनेने मुंबईत 40 वर्षांपूर्वी घडलेल्या अरुणा शानबाग प्रकरणाची आठवण जागी झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या एका रुग्णालयात अरुणा शानबाग ही परिचारिका म्हणून काम करत होती. रात्रपाळीत रुग्णांची सेवा करून ती भल्या सकाळी घरी जात होती. तत्पूर्वी कपडे बदलण्यासाठी ती रुग्णालयाच्या चेंजिंग रूम मध्ये गेली असताना रुग्णालयातील सफाई कामगार ने तिच्यावर झडप घातली. तिच्यावर बलात्कार केला आणि जाताना तिला ठार मारण्याच्या हेतूने तिच्या डोक्यावर लोखंडी कांबीने प्रहार केला. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना ती कोमात गेली. तब्बल 36 वर्षे ती कोमात होती. तिला इच्छा मरण द्यावे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले पण न्यायालयाने असमर्थता दर्शवली. चार वर्षांपूर्वी तिचे निधन झाले. ती 36 वर्षे कोमात होती. तिच्यावर बलात्कार करणारा तो सफाई कामगार दहा वर्षांची शिक्षा भोगून बाहेरही आला. अरुणा शानबाग मात्र रुग्णालयाच्या एका रूम मध्ये 36 वर्षे जिवंत प्रेत म्हणून बेडवर खिळून पडली होती. या घटनेने तेव्हा महाराष्ट्र हदरला होता आणि तिच्या मृत्यूनंतर सारा देश हळहळला होता.
अरुणा शानबाग ही वैद्यकीय क्षेत्राचा एक भाग(village) होती.. कोलकाता येथील आर जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या त्यात तरुणीची महाविद्यालयाच्या सेमिनार रूममध्ये हत्या करण्यात आली. त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. तिच्या डोळ्यात तिच्याच चष्म्याच्या काचा आढळल्या. तिच्या गळ्यातील स्वरयंत्राचे तुकडे झाले होते. तिच्या शरीरातील एकही हाड असे नव्हते की ते मोडले नव्हते. मृत्यूचा इतका भयाण, इतका भेसूर चेहरा असू शकतो? हा प्रश्नच मनाचा थरकाप उडवणारा आहे. डॉक्टर तरुणीच्या हत्येनंतर महाविद्यालयाचे, रुग्णालयाचे व्यवस्थापन किती गलथान होते हे लक्षात यावे. या डॉक्टर तरुणीच्या हत्येला व्यवस्थापनालाही जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले गेले पाहिजेत.
नवी दिल्लीतील निर्भया हत्याकांड हे देशात नव्हे तर परदेशातही गाजले. कोलकाता येथील हे प्रकरण सुद्धा देशाबाहेर पोहोचले आहे. भारतात स्त्रिया सुरक्षित नाहीत किंवा सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाते असा एक वाईट आणि प्रतिकूल संदेश या घटनेने देशभर जगभर पोहोचला आहे. हे देशाच्या प्रतिमेला हानिकारक आहे, देशाचे प्रतिमा भंजन आहे. कोलकाता येथील या प्रकरणाचा सीबीआय कडून तपासा सुरू असताना नेमका असाच प्रकार मुंबईतील शासकीय रुग्णालयाचा घडला आहे. सुदैवाने डॉक्टर तरुणीचा जीव वाचला आहे. अशा गुन्ह्यांच्या विरोधात, गुन्हेगारांच्या विरोधात संपूर्ण देश उभा राहिला पाहिजे.
या गुन्ह्यातील सर्व संशयित आरोपींच्या विरुद्धचा खटला द्रुतगतीने चालला पाहिजे. कनिष्ठ न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय हे सर्व टप्पे तीन ते चार वर्षात पूर्ण होऊन या गुन्ह्यातील नराधमांच्या गळ्यात फासाचा दोर आवळला गेला पाहिजे. माणसांच्या गर्दीचे जंगलात होत असलेले रूपांतर थांबवले तरच श्वापदांची निर्मिती थांबणार आहे अन्यथा
“क्रूरता, विकृती असे त्याला नाव, आज कोलकाता उद्या दुसरे गाव”अशी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
कोलकाता येथील आर जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या (village)रुग्णालयातील एका रूममध्ये घडलेल्या या प्रकाराने वैद्यकीय क्षेत्र चांगलेच हादरले आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीच्या मृत्यूला त्या वैद्यकीय महाविद्यालयाचे व्यवस्थापन जबाबदार आहे. तेथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था नव्हती. प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणींना राहण्यासाठी देण्यात आलेली सुविधा अतिशय वाईट होती.
त्या डॉक्टर तरुणीची हत्या अतिशय अमानुषपणे झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांना रुग्णालया व्यवस्थापनाने उशिरा माहिती दिली. तिचे आई-वडील रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांना त्या डॉक्टर तरुणीच्या मृतदेहापर्यंत जाऊ देण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. याचा अर्थ असा होतो आहे की रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाला काहीतरी लपवायचे होते. त्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीच्या हत्येनंतर देशभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या.
महाराष्ट्रात सह देशभरातील शासकीय आणि निमशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यामुळे आरोग्य सुविधा, यंत्रणा कोलमडून पडली होती. या घटनेनंतर देशभरातील उच्च शिक्षण देणाऱ्या सर्वच शिक्षणा संस्थांनी आपल्या कॅम्पस मध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची पुरेशी खबरदारी घेतली पाहिजे.
हेही वाचा :
शेतीच्या वादातून चुलत भावाचा निर्घृण खून
फडणवीसांना चिमुकलीची राखी, हे प्रेम कोणालाही नको वाटणार नाही
पुण्यातील फिनिक्स मॉलला बॉम्बहल्ल्याची धमकी, सुरक्षा व्यवस्था कडक