‘या’ गावात कधीच पाऊस पडत नाही, कारण जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला एका खास गावाची माहिती सांगणार (rains)आहोत. जगात अशीही काही ठिकाणे आहेत जिथे वर्षभर सर्वाधिक पाऊस पडतो. उदाहरणार्थ, मेघालयातील मासिनराम गाव, जिथे जगात सर्वाधिक पाऊस पडतो. परंतु तुम्ही कधी अशा ठिकाणाबद्दल ऐकले आहे का जिथे कधीही पाऊस पडत नाही? हे ठिकाण वाळवंट आहे असं नाही, तर हे एक गाव आहे, जिथे लोक राहतात. हे गाव पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 3200 मीटर उंचीवर वसलेले आहे. याविषयी जाणून घेऊया.

येमेनची राजधानी सनाच्या पश्चिमेला मांख संचालनालयाच्या हर्ज भागात वसलेल्या अल-हुतैब असे या गावाचे नाव आहे. पर्यटक अनेकदा येथे येऊन नेत्रदीपक दृश्याचा आनंद घेतात. डोंगरमाथ्यावर इथं इतकी सुंदर घरं बांधलेली आहेत, जी लोक पाहत राहतात. याविषयी पुढे अधिक विस्ताराने जाणून घेऊया.तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अल-हुतैब या गावात कधीच पाऊस पडत नाही कारण हे गाव ढगांच्या वर वसलेले आहे. या गावावर पावसाचे ढग कधीच तयार होत नाहीत. गावाच्या खाली नेहमीच ढगाळ वातावरण असते, त्यामुळे(rains) सखल भागात पाऊस पडतो पण गावात कधीच पाऊस पडत नाही.

जया किशोरी यांचं वक्तव्य, ‘रावण रेपिस्ट होता, त्याने सीतेला स्पर्श केलं नाही कारण…’
अल-हुतैब हे गाव पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 3200 मीटर उंचीवर वसलेले आहे. गावाभोवतीचे वातावरण खरोखरच उबदार आहे. हिवाळ्यात सकाळच्या वेळी वातावरण खूप थंड असले तरी सूर्य उगवताच लोकांना उकाड्याला सामोरे जावे लागते.ग्रामीण आणि शहरी वैशिष्ट्यांसह प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेची सांगड घालणारे हे गाव आता ‘अल-बोहरा किंवा अल-मुकारामा’ लोकांचा बालेकिल्ला बनले आहे. त्यांना येमेनी समुदाय म्हणतात.

येमेनी समाज हा मुंबईत वास्तव्यास असलेल्या मोहम्मद बुरहानुद्दीन यांच्या इस्माईली मुस्लिम पंथातील आहे. 2014 मध्ये मृत्यू होईपर्यंत ते दर तीन वर्षांनी या गावाला भेट देत असत(rains)अल-हुतैब या गावाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कधीच पाऊस पडत नाही. याचे कारण म्हणजे हे गाव ढगांच्या माथ्यावर वसलेले आहे. या गावाखाली ढग तयार होऊन पाऊस पडतो. इथलं दृश्य असं आहे की जे तुम्ही क्वचितच कुठेही पाहिलं असेल.हिवाळ्यात सकाळचे वातावरण एकदम थंड असते, पण जसजसा सूर्य उगवतो तसतशी उष्णता वाढते. हे गाव ‘अल-बोहरा किंवा अल-मुकारामा’ समुदायाच्या लोकांचा बालेकिल्ला आहे. या लोकांना ‘येमेनी समुदाय’ असेही म्हटले जाते.

हेही वाचा :

वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट

शक्तिपीठ महामार्गावरील मंदिरांसाठी ५-५ हजार कोटी निधी देऊन विकास साधावा – आमदार सतेज पाटील

महिमा चौधरीच्या 17 वर्षांच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष