विश्वास ठेवणं कठीण पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर…

महाराष्ट्राच्या राजकारणात आदरानं नाव घेतलं जाणारं पवार कुटुंब सध्या अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करत असून, याच कुटुंबातील सदस्य भारती पवार यांच्या निधनामुळं या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका प्रतिष्ठीत माध्यम समुहाचे अध्यक्ष, प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं सोमवारी सायंकाळी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 77 वर्षांच्या होत्या.

भारती पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर शोककळा कोसळली असून, यासंदर्भातील माहिती मिळताच आप्तेष्टांनी या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला. भारती पवार यांची लग्नाआधीची ओळख भारती श्रीपतराव पाटील. मुंबईतील शिवाजी पार्क इथं त्यांचं बालपण गेलं, तर येथील बालमोहन विद्यामंदिरात त्यांचं शालेय शिक्षण पार पडलं होतं. मुंबईतील रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शिक्षणात पदवी घेतली होती. पवार कुटुंबात आल्यानंतर भारती पवार समाजकार्यात बऱ्याच अंशी सक्रिय झाल्या.

काकी आमच्यात नाही यावर विश्वास ठेवणं कठीण…
भारती पवार यांच्या निधनानंतर नेतेमंडळींसह कुटुंबातील व्यक्तींनीसुद्धा त्यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. खुद्द अजित पवार, त्यांच्या सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाचा आधार घेत ‘काकी’ आपल्यात नाहीत, असं म्हणत हळहळ व्यक्त केली.

भारती पवार या आपल्यासाठी आईसमान असून, त्यांनी सर्वांवरच माया केली अशा शब्दांत भावनांना वाट करून देत पवार कुटुंबानं दु:ख व्यक्त केलं. ‘भारती काकी आमच्यात राहिल्या नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्या आम्हा सर्वांना आईसमान होत्या. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून हृदय दुःखाने पिळवटून गेले आहे. त्यांनी सर्व पवार कुटुंबावर निस्वार्थ प्रेम केले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो’, असं सुनेत्रा पवारांनी लिहिलं.

‘आम्ही पवार कुटुंब आज अत्यंत दुःखद प्रसंगाला सामोरे जात आहोत. आमच्या परिवारातील माझ्या धाकट्या काकी सौ. भारती प्रतापराव पवार यांच्या निधनाने आमच्या कुटुंबाची मोठी हानी झाली आहे. आईसमान असणाऱ्या माझ्या काकींबद्दलच्या लहानपणापासूनच्या अनेक आठवणी आणि त्यांचा लाभलेला सहवास माझ्या डोळ्यांसमोर तरळत आहे. काकींचा हसतमुख चेहरा, उत्साही आणि सतत कार्यशील राहण्याचा स्वभाव आमच्या नेहमी स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने प्रतापकाका, आम्ही सर्व बहीण-भावंडे आणि सर्व पवार कुटुंबियांच्या जीवनात कायमची पोकळी निर्माण झाली आहे. आमच्या लाडक्या भारतीकाकींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली’, असं लिहित अजित पवार यांनी भावना व्यक्त केल्या.

तर, ‘माझ्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. याक्षणी काकींच्या असंख्य आठवणींनी मनात घर केले आहे. त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्यांनी आम्हा सर्व भावंडांवर सदैव खुप प्रेम केले. आम्हा सर्व भावंडांना त्यांनी दिलेली प्रेमळ साथ सदैव लक्षात राहील’, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनीसुद्धा भारती पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा :

सैफ अली खान आणि करीना कपूरचा संसार मोडणार दीड वर्षात घेणार घटस्फोट

बेडरुमचा दरवाजा उघडला, समोर पत्नी नको त्या अवस्थेत पाहून …

‘तू हिरोईन वाटतेस तरी का?’ विद्या बालनला पालकांसमोरच दिग्दर्शकाने केलं अपमानीत

कुत्र्याशी तुलना, आज ही अभिनेत्री आहे ३०१० कोटींच्या साम्राज्याची सून