जणू सिद्धू मूसेवालाच परत आलाय ज्युनियर सिद्धूला पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

दिवंगत पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवालाचा छोटा भाऊ (brother)शुभदिपचा सोमवारी पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग छन्नीसुद्धा उपस्थित होते. सोशल मीडियावर त्यांनी या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘हॅपी बर्थडे सिद्धू साहब वाढदिवसाच्या शुभेच्छा सिद्धू साहेब’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओ दिलं आहे. काळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि डोक्यावर गुलाबी पगडी अशा पोशाखात छोटा सिद्धू खूपच क्यूट दिसत होता. यावेळी सिद्धू मूसेवालाचा मोठा कटआऊट फोटो मागे लावलेला दिसून आला.

गेल्या वर्षी दिवंगत सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी मुलाला जन्म दिला होता. सिद्धू मूसेवालाचं मूळ नाव शुभदिप असं होतं. त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी दुसऱ्या मुलाचं नावसुद्धा शुभदिप असंच ठेवलंय. वयाच्या 28 वर्षी सिद्धू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 29 मे 2022 रोजी पंजाबमधील मनसा याठिकाणी सिद्धूवर 20 ते 30 गोळ्या झाडल्या होत्या. (brother)राज्य सरकारने सिद्धू मूसेवालाची सुरक्षाव्यवस्था काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला होता. काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरून त्याने मनसा मतदारसंघात पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. सिद्धूच्या हत्येप्रकरणी 31 जणांवर आरोप करण्यात आले होते. ज्यामध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचाही समावेश होता.

सिद्धू मूसेवाला हा पंजाबमधील अत्यंत प्रसिद्ध गायक आणि रॅपर होता. तो स्वत:च त्याची गाणी लिहायचा आणि त्यांची निर्मिती करायचा. तो सर्वांत श्रीमंत पंजाबी गायकांपैकी एक होता. सिद्धूने 2017 मध्ये संगीतविश्वात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर त्याचे अनेक म्युझिक अल्बम गाजले. ‘लेजंड’, ‘सो हाय’, ‘द लास्ट राइड’ यांसारख्या त्याच्या गाण्यांना चाहत्यांकडून खूप प्रतिसाद मिळाला. सिद्धूच्या निधनानंतरही (brother)त्याची गाणी कुटुंबीयांकडून प्रदर्शित करण्यात आली आणि त्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला. सिद्धू मूसेवाला हा एकुलता एक मुलगा होता. एकुलत्या एक तरुण मुलाच्या हत्येच्या घटनेनं बलकौर सिंग आणि चरण कौर पूर्णपणे खचले होते. अखेर वयाच्या 58 व्या वर्षी चरण कौर यांनी IVF द्वारे पुन्हा आई होण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा :

सैफ अली खान आणि करीना कपूरचा संसार मोडणार दीड वर्षात घेणार घटस्फोट

बेडरुमचा दरवाजा उघडला, समोर पत्नी नको त्या अवस्थेत पाहून …

‘तू हिरोईन वाटतेस तरी का?’ विद्या बालनला पालकांसमोरच दिग्दर्शकाने केलं अपमानीत

कुत्र्याशी तुलना, आज ही अभिनेत्री आहे ३०१० कोटींच्या साम्राज्याची सून