मुकेश अंबानी आणि राधिका मर्चंटचा दुसरा प्री- वेडिंग इव्हेंट नुकताच(surprise for boyfriend) आटोपला. या सोहळ्याला हॉलिवूडसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. यावेळी लग्नाला ‘नो फोन पॉलिसी’ असल्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी प्री- वेडिंग इव्हेंटमधील फोटो किंवा व्हिडीओ शेअर केलेले नाही. पण अशातच सध्या इन्स्टाग्रामवर एका बॉलिवूडच्या क्यूट कपलचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जान्हवी कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया(surprise for boyfriend) यांनी जरीही त्यांचं नातं जाहीर केलं नसलं तरीही त्यांच्या रिलेशनची कायमच चर्चा होते. अनेकदा हे क्यूट कपल सोशल मीडियावर चर्चेत असतं. अनेकदा सोशल मीडियावर हे कपल एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच सध्या, राधिका आणि मुकेश यांच्या इटलीतल्या दुसऱ्या प्री- वेडिंगमधील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. दोघंही वयाच्या १५- १६ वर्षापासूनच एकमेकांना ओळखत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जान्हवीने S नावाचं लॉकेटही वेअर केलेलं होतं. तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होत आहे.
सध्या इन्स्टाग्रामवर जान्हवी व शिखरचा प्री-वेडिंगमधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओत, जान्हवी आणि शिखर आपल्या मित्र-मैत्रीणींसोबत प्री-वेडिंग एन्जॉय करताना दिसत आहेत. तसंच अभिनेत्री मैत्रिणींसोबत गप्पा मारत असताना दुसऱ्या बाजूला बॉयफ्रेंडला जेवणाचा घास भरवताना दिसते.
जान्हवी आणि शिखरच्या या क्यूट व्हिडीओमुळे पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. सध्या ह्या व्हिडीओवर चाहत्यांकडून त्यांच्या रिलेशनचे जोरदार कौतुक होत आहे. त्यासोबतच त्यांना अनेकांनी ‘मेड फॉर इच अदर’ अशीही कमेंट केलेली आहे.
एकीकडे पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिलेली जान्हवी सध्या तिच्या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. एकीकडे प्री-वेडिंगमध्ये जान्हवी धमाल मस्ती करत असून बॉक्स ऑफिसवर तिचा चित्रपट फारशी कमाई करताना दिसत नाही. पहिल्या दिवशी दिलासादायक प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रेक्षकांनी तिच्या चित्रपटाला म्हणावा तितका खास प्रतिसाद दिलेला नाही.
हेही वाचा :
महावितरणच्या कार्यालयांना आता ‘स्मार्ट मीटर’
मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री
मोठी बातमी! विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी राज्यात 100 रोजगार मेळावे;