कांजिवरम साडी… बॉयफ्रेंडची साथ… तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचली जान्हवी कपूर

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या आईच्या अर्थात(darshan) पाऊलावर पाऊल ठेव चालताना दिसत आहे. आज तर श्रीदेवी यांचा जन्म दिवस आहे आणि त्यानिमित्तानं जान्हवी ही तिरुपती बालाजीचं दर्शन करण्यासाठी पोहोचली आहे. दरवर्षी प्रमाणे तिनं यंदाही श्रीदेवी यांच्या जन्म दिवशी बालाजीचं दर्शन घेतलं आहे. त्याचे काही फोटो जान्हवीनं शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

जान्हवीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो (darshan)शेअर केले आहेत. जान्हवीनं या पोस्टमध्ये एक तिरूपती बालाजीच्या पायऱ्यांचा फोटो शेअर केला आहे. तर दुसरा हा श्रीदेवी आणि जान्हवी दिसत आहेत. तर तिसरा फोटो हा जान्हवीनं स्वत: चा शेअर केला आहे. या फोटोत तिनं पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर हे फोटो शेअर करत तिनं कॅप्शन दिलं की आई वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबत तिनं लाल रंगाचं इमोटीकॉन शेअर केलं आहे. आई खूप खूप प्रेम.

त्याशिवाय जान्हवीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावेळी तिच्यासोबत शिखर पहारिया देखील तिरुपती बालाजीला गेला होता. त्यानं वेष्टी परिधान केली होती तर जान्हवीनं साडी नेसली होती. या व्हिडीओत जान्हवी दंडवत प्रणाम करताना दिसते. त्यानंतर ते दोघं मंदिरातून बाहेरून जाताना दिसले.

दरम्यान, जान्हवीची धाकटी बहीण खूशी कपूरनं याआधी आई श्रीदेवी आणि जान्हवी कपूरसोबत फोटो शेअर केला होता. त्यानंतर बोनी कपूर यांनी देखील श्रीदेवींचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा फोटो 2012 इंग्लीश विंगलिश या चित्रपटातील आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं की ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा जान.’

श्रीदेवी या बॉलिवूडच नाही तर भारतातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी जवळपास 5 दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांच्या अभिनयानं त्यांनी सगळ्यांना भुरळ पाडली होती. त्यांनी फक्त हिंदीच नाही तर त्यासोबत तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये देखील चित्रपट केले आहेत. तर त्यांचे 2018 मध्ये निधन झाले.

दरम्यान, जान्हवी कपूरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच ‘देवारा : पार्ट 1’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याशिवाय ती ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ आणि सुर्याच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक; भाजपसाठी आरएसएस मोठे पाऊल उचलणार

नवरा आणि प्रियकरानं रचला कट, ‘दृश्यम’ स्टाईल काढला काटा

तू 1500 रुपये परत घेऊन दाखवच, बघते तुझा काय कार्यक्रम करते, सुप्रिया सुळेंचा रवी राणांना इशारा