विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर “मविआ” ला तारणार?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या लोकसभा(factoring) निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा महा विकास आघाडीला काही प्रमाणात पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक फायदा झाला, हे आता लपून राहिलेले नाही. आता मनोज जलांगे पाटील यांचे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू झाले आहे. हे उपोषण आणखी दोन महिने या ना त्या कारणाने लांबत गेले तर त्याचा मोठा फटका महायुतीला बसून हा विकास आघाडीला फायदा होऊ शकतो, जसा दहा वर्षांपूर्वी अण्णा हजारे फॅक्टर चा फायदा भाजपा आणि एनडीएच्या घटक पक्षांना झाला होता. काँग्रेसचे डॉक्टर मनमोहन सिंग सरकार तेव्हा सत्तेवरून पाय उतार झाले होते.

गेल्या वर्षी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी(factoring) या तेव्हा उर्वरित महाराष्ट्राला परिचित नसलेल्या गावात मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हा मरण उपोषणाला बसले होते. पण त्याचीही माहिती महाराष्ट्राला नव्हती. जेव्हा तेथील पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढण्यासाठी अमानुष लाठीमार केला तेव्हा एका रात्रीत अंतरवाली सराटी हे गाव आणि मनोज जरांगे पाटील हे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर मीडियाने हे आंदोलन सतत गाजवत आणि वाजवत ठेवले.

या आंदोलनाचा 50 पेक्षा अधिक पोलिसही जखमी झाले होते पण मराठा आंदोलन गंभीररित्या जखमी झाले होते. तेव्हा सर्वात आधी जखमींची विचारपूस करण्यासाठी शरद पवार हे अंतरवाली सराटी गावात पोहोचले होते. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पोलीस प्रशासनावर”मीडिया ट्रायल”सुरू झाली. लाठी मालाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. संपूर्ण महाराष्ट्र हळूहळू तणावस्थेत बनत गेला. यावर्षीच्या जानेवारीपर्यंत सकल मराठा समाजाचे उपक्रम आंदोलन सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आणि एक दिवसाचे विधिमंडळ अधिवेशनही घेतले.

जरांगे पाटील यांनी मुंबईच्या प्रवेशद्वारावर आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. नंतर लोकसभा निवडणुकांचा माहोल सुरू झाला मराठा समाजाला न्याय देण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया मात्र शासनाकडून सुरू झाली नाही. त्यामुळे मराठा समाज नाराज होता. त्या नाराज समाजाने महायुतीच्या काही उमेदवारांचा निवडणुकीत “करेक्ट कार्यक्रम” केला. आता निवडणूक निकालानंतर राजकीय क्षेत्रात त्याची उघडपणे चर्चाही होऊ लागली आहे. शरद पवार यांच्या डिजिटल पोस्टरवर मनोज धनंजय पाटील यांचे फोटो सुद्धा लावले गेले आहेत.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका तीन-चार महिन्यावर आल्या आहेत जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. अंतरवाली सराटी गावात आमदार खासदार आणि मंत्री यांची ये जा सुरू झाली आहे. वर्दळ वाढली आहे. तेथे गर्दी ही वाढू लागली आहे. आता तर “आम्ही जरांगे”या नावाचा एक मराठी चित्रपट ही प्रदर्शित होतो आहे. कंठा पाटील यांचे आंदोलन तापत जाईल. “सगेसोयरे” हा कळीचा मुद्दा मान्य होईपर्यंत अधून मधून स्थगित होतं हे आंदोलन सुरू राहील. 288 विधानसभा मतदारसंघात आम्ही आमचे उमेदवार उभा करू हा त्यांनी दिलेला इशारा गांभीर्याने घेतला पाहिजे. राज्य शासनाच्या ठोस आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण आंदोलन जुलै महिन्यापर्यंत स्थहित केले आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी नवी दिल्ली येथील जंतर मंतर रोडवर गेस्ट सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे काही मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसले होते. देशभरात समर्थन तेव्हा मिळाले होते. केंद्र शासनाच्या म्हणजेच डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या विरोधात देशभर वातावरण तयार झाले होते. परिणामी नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारचा ताडावर झाला आणि भाजप प्रणित एनडीए सरकार सत्तेवर येऊन नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले. आता सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला, महायुतीला जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महागात पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित अपयशाबद्दल महायुतीचे काही नेते जरांगे फॅक्टर बद्दल उघडपणे बोलू लागले आहेत. मात्र महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार हे जरांगे फॅक्टर बद्दल काहीही बोलावयास तयार नाहीत. जरांगे पाटील यांचे उपोषण लांबत जाईल, विधानसभेचे ढोल वाजू लागतील तेव्हा मात्र जरांगे पाटील फॅक्टर चर्चेत येणार हे मात्र निश्चित.

हेही वाचा :

आज शेअर बाजारात संमिश्र संकेत; कोणते शेअर्स असतील चर्चेत?

भाज्यांचे दर वाढल्याने सामान्यांना फुटला घाम; दर १०० पार

भाजप-शिंदे गटात वादाची पहिली ठिणगी; मंत्रिमंडळातून अब्दुल सत्तार यांच्या हकालपट्टीची मागणी