सांगलीच्या जागेवर जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, ‘अपक्ष उमेदवाराची शिफारस…’

सांगली लोकसभेत काँग्रेसमध्ये विशाल पाटील(current political news)यांनी केलेली बंडखोरी राज्यभर चर्चेचा विषय ठरली. अपक्ष म्हणून विशाल पाटील सांगलीच्या मैदानात उतरले. महाविकास आघाडीतून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील मैदानात होते. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी शेवटपर्यंत विशाल पाटील यांना तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. त्यांनी थेट नाव न घेता विशाल पाटील यांना तिकीट मिळून नये म्हणून प्रयत्न केल्याचे सांगितले.

ठाकरे गटाने त्यांचा उमेदवार सांगलीच्या(current political news) मैदानात उतरवण्यामागे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील असल्याची अप्रत्यक्ष टीका देखील होत होती. या टीकेला प्रथमच उत्तर देताना विशाल पाटील यांचे नाव न घेता ‘सांगलीतील अपक्ष उमेदवाराची शिफारस मी केली होती’, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

‘सांगली मतदारसंघात माझ्या नावाने खडे फोडले जात आहेत; मात्र सध्याच्या अपक्ष उमेदवाराच्या नावाची मी स्वतः शिफारस केली होती, असा खुलासा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांचा नामोल्लेख टाळत इस्लामपूर येथे केला. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या (ठाकरे गट) कोल्हापूर, हातकणंगले या जागांवर शाहू महाराज आणि राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याने त्यांनी सांगलीच्या जागेवर परस्पर उमेदवारी जाहीर केली, असे देखील जयंत पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या आभार सभेत पाटील बोलत होते.

उद्धव ठाकरे यांना दोनदा राजू शेट्टी भेटून आले होते. त्यांच्या नावाची शिफारस आम्ही केली होती. मात्र त्यानंतर चित्र वेगळे झाले. आम्ही सत्यजित पाटील यांच्या नावाची शिफारस केली. उध्दवजी ठाकरे यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी आमदार बंटी पाटील यांच्याकडे आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त करून पत्राचा मसुदाही दिला. मात्र त्यानंतर उध्दवजी ठाकरे यांनी आपला निर्णय कायम ठेवला, असे जयंत पाटील म्हणाले.

राज्यातील 48 जागांमध्ये भाजपास 12 ते 15 पेक्षा जादा जागा मिळणार नाहीत, असे आजचे चित्र आहे, असे जयंत पाटील म्हणाले. भाजपला 2019 मध्ये 37 टक्के मते घेऊन सत्तेत आले होते. मात्र या निवडणुकीत ते 32 ते 33 टक्क्यांपर्यंत खाली आल्यास ते देशातील सत्तेतून जाऊ शकतात, असा दावा देखील पाटील यांनी केला.

हेही वाचा :

‘धैर्यशील मानेंना पराभवाची भीती म्हणून भाजप जिल्हाध्यक्षावर…’, ‘स्वाभिमानी’चा दावा

धक्कादायक! टीएमसी- भाजप कार्यकर्ते भिडले; मारहाणीत महिला कार्यकर्त्याचा मृत्यू

सचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग…Video