“राज ठाकरें ना स्वतः साठी लढायचे आहे का दुसऱ्यांची मत फोडायसाठी? ते दुसऱ्यांची सेवा (office) करण्यासाठी लढत असतील”, असा टोला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावलाय. निष्ठावान संवाद दौऱ्याच्या निमित्ताने जयंत पाटलांनी परभणी येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
भाजप हसन मुश्रीफ यांच्या दाव्यामुळे नाराज असेल
हसन मुश्रीफ यांनी 165 जागा जिंकणार असल्याचे सांगितले (office). मात्र त्यांना ते माहित आहे का की, लोकसभेत जसं भाजपने 400 पारचा नारा दिला होता, तसाच विधानसभेला 200 पारचा नारा दिलाय. त्यामुळे भाजप हसन मुश्रीफ यांच्या या दाव्यामुळे नाराज असेल, असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय. शिवाय जयंत पाटील यांनी राज ठाकरेंच्या 225 जागा लढवण्यावरही भाष्य केले आहे.
आम्ही येत्या विधानसभेत 175 पेक्षा जास्त जागा जिंकणार
हसन मुश्रीफ 165 चा दावा करत असले तरी त्यांच्यावर भाजप चिडणार कारण त्यांना 200 पारचा नारा द्यायचा आहे. त्यातच आम्ही येत्या विधानसभेत 175 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केलाय. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, सत्ता, साधन संपत्ती, खोटी आश्वासने, महागाई, प्रचंड बेरोजगारी, पददलिंतांवर होणारा अन्याय, महिलांवर होणारे अत्याचार, आणि शेतकऱ्यांविरोधातील धोरणे हा भाजपचा स्थायी भाव झालेला आहे. खुर्ची टिकवण्यासाठी पडेल ती किंमत देण्याची तयारी भाजपची आहे. त्यामुळेच अर्थसंकल्पात आंध्र प्रदेश आणि बिहारला झुकते माप दिले गेले.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवण्याचं काम महाराष्ट्रातील जनता करणार आहे. जालना ते नांदेड एक्स्प्रेस वेचे टेंडर 11 हजार 441 कोटींचे होते. ते गेले 15 हजार 464 कोटींवर आहे. कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपनीला दिले आहे ती कंपनी ब्लॅकलिस्ट झालेली आहे. मागे चांद्रयान मोहीम झाली. त्यासाठी एकूण 600 कोटी रुपयांचा खर्च झाला. आणि इथे मात्र 1 किलोमीटर रस्ता बनवण्यासाठी तब्बल 83 कोटी रुपये खर्च करणार आहेत. तुमच्या खिशातले पैसे वाया घालवत आहेत. आता तुम्ही ठरवा सर्वात भ्रष्ट पक्ष कोणता आणि त्याचा म्होरक्या कोण? असंही जयंत पाटील म्हणाले
हेही वाचा :
इचलकरंजीतील पूरग्रस्तांचा जलसमाधी इशारा, हिप्परगी आणि आलमट्टी धरण विसर्ग वाढविण्याची मागणी
नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिलं उत्तर: “आर्थसंकल्पावर त्यांच्या टीकेला काही अर्थ नाही”
पावसाळी हंगाम: दुचाकीची काळजी घ्या, टाळा ‘ही’ चूक, नाहीतर…