राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा(political issue) दारुण पराभव झाला. या पराभवानंत मविआतील राजकीय पक्ष सैरभैर झाले आहेत. या पक्षातील नेत्यांना आपल्या भवितव्याची चिंता सतावू लागली आहे. यातच पक्षांतराचं राजकारण सुरू झालं आहे.

या पक्षांतराचा सर्वाधिक फटका ठाकरे(political issue) गटाला बसला आहे. त्या खालोखाल शरद पवार गटातील नेतेही महायुतीत एन्ट्री घेऊ लागले आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा आता मागे पडल्या आहेत. जयंत पाटील नाही तर दुसरा एक मोठा नेता भाजपाच्या गळाला लागला आहे. जयंत पाटलांचे बंधू आणि माजी आमदार पंडीत पाटील आजच भाजपात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजपाचं वारं वाहत आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही इनकमिंग वाढली आहे. तिन्ही पक्षांत येण्यासाठी महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत स्पर्धा सुरू आहे. कालही मुंबईत काही मोठ्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आज जयंत पाटील यांचे बंधू आणि माजी आमदार पंडित पाटील तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या माजी मंत्र मिनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत.
भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज दोन्ही पक्षप्रवेश होणार आहेत. आज सकाळी 11 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश पार पडतील अशी माहिती मिळाली आहे. आस्वाद पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आमदार जयंत पाटील यांचे भाचे आहेत.

आस्वाद पाटील भाजपात (political issue)प्रवेश करणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती. आपल्या समर्थकांशी चर्चा करण्यासाठी 10 डिसेंबर 2024 रोजी अलिबाग शहरातील रवीकिरण हॉटेलमध्ये बैठक आयोजित केली होती. याच बैठकीत त्यांनी पक्षातून राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी शेकापच्या जिल्हा चिटणीस आणि सदस्य पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवला होता.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आस्वाद पाटील, माजी आमदार सुभाष पाटील प्रचारापासून लांब राहिले होते. शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांचा शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी तब्बल 30 हजार मतांनी पराभव केला होता. यानंतर वाद अधिकच वाढत राहिले. यानंतर पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राजीनामा दिल्यानंतर आस्वाद पाटील लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील अशा चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आज त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे.
हेही वाचा :
मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय; नगराध्यक्षांना बहुमताने हटवता येणार
मोठी बातमी ! साताऱ्यातील ‘हा’ बडा नेता करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
शेतकऱ्यांना दिलासा, यंदा धो धो कोसळणार पाऊस, हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी