Jio चा ‘हा’ प्लॅन Airtel पेक्षा 50 रुपयांनी स्वस्त

Jio आणि Airtel च्या युजर्ससाठी ही बातमी खास आहे. आज आम्ही असे दोन प्लॅन्स(plan) सांगणार आहोत, ज्यामुळे कोणता रिचार्ज प्लॅन तुमच्या फायद्याचा आहे किंवा कोणता प्लॅन घ्यावा, हे तुम्हाला समजून येईल. विशेष म्हणजे यात Jio चा ‘हा’ प्लॅन Airtel पेक्षा 50 रुपयांनी स्वस्त आहे. आता हा नेमका कोणता रिचार्ज प्लॅन आहे, हे जाणून घेण्यासाठी Jio आणि Airtel या दोन्ही कंपनीचे प्लॅन समजून घ्या.

प्रीपेड युजर्ससाठी रिलायन्स जिओचे अनेक शानदार प्लॅन(plan) आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. हा प्लॅन तुम्हाला Airtel पेक्षा 50 रुपयांनी स्वस्त मिळेल. Jio च्या या प्लॅनची किंमत 249 रुपये असून हा प्लॅन Airtel कंपनीच्या 299 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देतो. मुकेश अंबानी यांची कंपनी तुम्हाला 249 रुपयांत कोणते फायदे देईल? चला जाणून घेऊया.

रिलायन्स Jio च्या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज 1 GB हायस्पीड डेटा, लोकल आणि STD नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि रोज 100 SMS मिळतात. 28 दिवसांची वैधता असलेल्या या रिचार्ज प्लॅनसोबत जिओ क्लाऊड आणि जिओ टीव्ही सारख्या अ‍ॅप्सचा फ्री अ‍ॅक्सेसही मिळतो. जर डेली डेटा संपला तर स्पीड लिमिट 64kbps पर्यंत कमी होईल.

299 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 1 GB हाय स्पीड डेटा, फ्री कॉलिंग आणि 100 SMS मिळतात. 28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनसोबत स्पॅम कॉल आणि SMS अलर्ट आणि एका महिन्यात फ्री हॅलोट्यूनचा अ‍ॅक्सेस देखील दिला जातो.

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, रोज 100 SMS वापरल्यानंतर तुम्हाला प्रति लोकल SMS 1 रुपया आकारला जाईल. तर STD SMS साठी दीड रुपये शुल्क भरावे लागणार आहे. Jio प्रमाणेच Airtel च्या या प्लॅनमध्ये डेटा लिमिट पूर्ण झाल्यावर स्पीड 64kbps पर्यंत कमी होईल.

Jio आणि Airtel कंपनीच्या रिचार्ज प्लॅनमधील फरकाबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही प्लॅनमध्ये समान डेटा, कॉलिंग आणि SMS बेनिफिट्स दिले जात आहेत. एक्स्ट्रा बेनिफिट्समध्ये फरक पडू शकतो, पण या फरकासाठी 50 रुपये जादा खर्च करणे योग्य आहे की नाही, हे तुमच्या गरजांवर अवलंबून आहे.

हेही वाचा :

ह्या साठी सुद्धा थोडी शिल्लक ठेवा ऊर्जा!

बायकोनं भाजी केली नाही, नवऱ्याच डोकं सटकलं, कुऱ्हाडीने तुकडे केले अन् पोलिसांत गेला

रोहित शर्माला झालंय काय?, चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान भारताचं टेन्शन वाढलं