जिओचा दिवाळी धमाका… अंबानींनी केली AI क्लाउडची घोषणा

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मुंबईतील ४७व्या वार्षिक सर्वसाधारण(Diwali) सभेत भारतातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) उपक्रमाचे चित्र स्पष्ट केले. मुकेश अंबानींनी जिओ वापरकर्त्यांना दिवाळी भेट देत AI-Cloud वेलकम ऑफरमध्ये जिओ वापरकर्त्यांना 100GB मोफत क्लाउड स्टोरेज देण्याची घोषणा केली. त्याचवेळी, उद्योगपती म्हणाले की, प्रत्येक भारतीयाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी जोडणे रिलायन्सचे उद्दिष्ट असून यासाठी जिओ आपले आर्टिफिशियल इंटेलिजन्स – जिओ ब्रेन लाँच करणार आहे.

मुकेश अंबानी(Diwali) म्हणाले की, जिओ ब्रेन आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रोग्रामसाठी गुजरातमधील जामनगरमध्ये एआय डेटा सेंटर उभारले जाईल. जिओ AI Cloud देखील यावर्षी दिवाळीला वापरकर्त्यांसाठी लाँच केले जाईल. अंबानींनी जिओ AI क्लाउड ऑफर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे ज्यामध्ये प्रत्येक वापरकर्त्याला 100 GB क्लाउड स्टोरेज पूर्ण मोफत देण्याची घोषणा केली.

मुकेश अंबानी म्हणाले, जिओ एआय क्लाउड वेलकम ऑफरची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. जिओ वापरकर्त्यांना 100 जीबी FPS क्लाउड स्टोरेज मिळेल ज्यामध्ये त्यांचे फोटो, व्हिडिओ, दस्तऐवज आणि इतर डिजिटल कंटेन्ट व डेटा संग्रहित करू शकतील. त्यांनी म्हटले की, आम्ही यावर्षी दिवाळीला जिओ AI क्लाउड वेलकम ऑफर लाँच करू, ज्याद्वारे आम्ही शक्तिशाली आणि परवडणारे सोल्युशन्स आणत आहोत ज्यामध्ये क्लाउड डेटा स्टोरेज व डेटा-चालित AI सेवा सर्वत्र सर्वांसाठी उपलब्ध असतील.

रिलायन्स एजीएम बैठकीला संबोधित करताना मुकेश अंबानी म्हणाले, जिओ अशी टूल्स आणि प्लॅटफॉर्म विकसित करत आहे ज्यामध्ये संपूर्ण AI लाइफसायकल दिसेल, ज्याला जिओ ब्रेन असे नाव देण्यात आले आहे. रिलायन्स गुजरातच्या जामनगर येथे गिगावॅट-स्केल AI सेटअप तयार करत आहे जे कंपनीच्या ग्रीन एनर्जीद्वारे समर्थित असेल.

जिओ Cloud बद्दल तपशीलवार माहिती देताना आकाश अंबानी म्हणाले की, जिओ Cloud दिवाळीला लॉन्च होईल. यासोबतच जिओ होममध्ये नवीन फीचर्स देखील ॲड-ऑन असतील ज्यामध्ये आता AI च्या मदतीने जिओ सेटअप बॉक्स सहज वापरणे शक्य होईल.

यासाठी ‘हॅलो जिओ ऑफर’ सादर करण्यात येत आहे, ज्यामुळे वापरकर्ते सेटअप बॉक्स सहज चालवू शकतील. रिलायन्स इंडस्ट्रीज गुगलच्या जेमिनी आणि ओपन एआयच्या ChatGPT आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यासाठी स्वतःचा जिओ ब्रेन लॉन्च करणार असून यासाठी रिलायन्स गुजरातमधील जामनगरमध्ये AI डेटा सेंटरही तयार करत आहे.

हेही वाचा:

‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह रिलीज डेटची घोषणा

ट्रक आडवा आला अन् अचानक सर्व दुचाकी रस्त्यावर जोरदार आपटल्या Video Viral

अजित दादांना ताईंचा दे धक्का?; राष्ट्रवादीचा आमदार थेट सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये