अभिनेता अजय देवगण आणि काजोल (exhausted)हे दोघे मनोरंजनसृष्टीमधील सर्वात यशस्वी जोडप्यांपैकी एक आहेत. हे दोघे 1999 साली विवाहबंधनात अडकले. अजय देवगण आणि काजोल या दोघांचाही मोठा चाहबता वर्ग आहे. दोघांनीही प्रकाशझोतापासून दूर राहत लपूनछपून लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नात केवळ घरची मंडळी आणि अगदी जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. दोघेही त्यावेळेस आपल्या लव्ह लाइफबद्दल बोलायचे.

लग्नापूर्वीच हनिमूनसंदर्भात घातलेली अट
एका मुलाखतीमध्ये काजोलने अजय देवगणबरोबर लग्न करण्याआधी एक अट ठेवली होती, असं सांगितलं. मला जगभरात भटकायचं आहे, असं काजोलने अजय देवगनला सांगितलं होतं. ‘आप की अदालत’ या कार्यक्रमामध्ये कालजोलने याबद्दलचा खुलासा केला होता. एवढेच नाही (exhausted)तर काजोलने हनिमूनसंदर्भातही अजय देवगणकडे एक विचित्र अट ठेवली होती. अजय देवगणने जेव्हा लग्नाची इच्छा व्यक्त केली होती तेव्हाच काजोलने हनिमूनसंदर्भात आपली ही अट होकार देण्यापूर्वी ठेवली होती. ज्याला अजयने होकारही दिला होता.
अजयने अट मान्य केली, लग्न झालं; पण…
काजोलने या मुलाखतीमध्ये, “मी लग्नाआधीच त्याला, तुला खरंच माझ्याशी लग्न करायचं आहे का? असं विचारलेलं. तसेच असं असेल तर तुला मला दोन महिन्यांच्या हनिमूनला न्यावं लागेल. त्यावर अजयने मला ‘ओके बेबी’ असं उत्तर दिलेलं,” अशी माहिती दिली. आश्चर्याची बाब म्हणजे अजयने अधिक काजोलला होकार दिला. दोघांचं लग्न झालं. मात्र अजयने दिलेला शब्द पाळला नाही. हनिमूनला 40 दिवस झाल्यानंतर अजयला घरची फार आठवण येऊ लागली. त्यामुळे तो काजोलबरोबर परतला. अजय देवगणने आजारी पडल्याचं नाटक केलं. त्याने काजोलला सांगितलं की मला फार ताप येतोय. मात्र काजोलने त्याला औषध घे, डॉक्टरांकडे जा (exhausted) बरं वाटेल असं सुचवलं होतं. मात्र अजयला घरी जायची ओढ लागलेली.

“हनिमून संपेपर्यंत अजय थकून गेला होता. त्याला सतत घरची आठवण येत होती. 40 दिवसांनंतर तो अगदी ‘मी थकलोय’ अशा परिस्थितीमध्ये होता. मला ताप आलाय. मला घरची आठवण येतेय, असं तो म्हणत होता. त्यावेळेस मी त्याला आपण परत जाऊ असं सांगितलेलं,” अशी आठवण काजोलने शेअर केली. लग्नापूर्वी होकार देऊनही काजोलची अट अजयला पूर्ण करता आली नाही हेच तिला यामधून अधोरेखित करायचं होतं.
हेही वाचा :
“कराड” प्रवृत्ती कडून “व्यवस्थे” चीही हत्या!
“उर्फीचे व्हिडीओ पाहून माझा मुलगा म्हणाला…”; चित्रा वाघ पहिल्यांदाच बोलल्या
चहावाल्याचा धक्कादायक निर्णय! सुसाईड नोट थेट आमदाराच्या कार्यालयात