कलानगर महागणपती गणेशोत्सव मंडळाला कोल्हापूर पोलीस विभागाकडून उत्कृष्ट पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर: कलानगर महागणपती गणेशोत्सव मंडळाला गणेशोत्सव 2024 अतिशय दिमाखदार, डॉल्बीमुक्त, शासकीय नियमानुसार, पारंपारिक आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा केल्याबद्दल कोल्हापूर पोलीस विभागाकडून उत्कृष्ट पुरस्काराने(award) सन्मानित करण्यात आले.

पोलीस महानिरीक्षक मा. श्री. सुनील फुलारी साहेब आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब यांच्या हस्ते मंडळाला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. गणेशोत्सवातील सामाजिक, सांस्कृतिक, आणि कलात्मक कार्याचा गौरव(award) करत मंडळाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मंडळाचे सुकाणू समिती प्रमुख श्री सुनील तोडकर, श्री रमाकांत वाळवेकर, सन 2024 चे अध्यक्ष श्री जयवंत म्हेतर, श्री प्रशांत सपाटे, श्री सचिन तोडकर आणि श्री पंकज डंबाळ यांसह अनेक सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यातील विविध परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

गणेशोत्सव 2024 या वर्षी पारंपरिक व शासकीय नियमानुसार डॉल्बीमुक्त वातावरणात साजरा करण्यात आला. मंडळाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मंडळाच्या सामाजिक योगदानाची दखल घेत, शिवाजीनगर पोलीस निरीक्षक श्री सचिनराव पाटील आणि श्री सतिश कुंभार यांच्यासारख्या मान्यवरांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमादरम्यान मंडळाच्या वतीने पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी साहेब व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब यांना कलानगर महागणपतीची प्रतिकृती भेट देण्यात आली.

मंडळाचे सुकाणू समिती सदस्य, पदाधिकारी, व सर्व सदस्य यांच्या अथक परिश्रमामुळेच हा सन्मान शक्य झाला. मंडळाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत या गौरवासाठी सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

कलानगर महागणपतीच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत संपूर्ण जिल्ह्यात मंडळाचे कौतुक होत आहे.

हेही वाचा :

निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेस आक्रमक; उद्या राज्यभर आंदोलन

सारा अली खानसोबतच्या अफेयर्सच्या चर्चांवर रुमर्ड बॉयफ्रेंडने सोडलं मौन

राजपाल यादव यांच्या वडिलांचे निधन, दिल्लीतील AIIMS मध्ये सुरु होते उपचार!