“कमळ”आता जपून ठेवा तसा थोडा उशीरच झाला!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठे समाजसेवी संघटन(political) म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहिले जाते. भारतीय राजकारणात आपली सुद्धा एक शाखा असावी म्हणून संघाने जनसंघाची स्थापना केली. आज त्याचे नामांतर भारतीय जनता पक्ष असे झाले असून देशातील बलाढ्य राजकीय पक्ष तो आज बनला आहे. तथापि शताब्दीच्या उंबरठ्यावर असलेल्या संघावर आज भाजपचे कान पिळून चार खडे बोल सुनावण्याची वेळ आली आहे. संघाचे मुखपत्र असलेल्या द ऑर्गनायझर ने आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी एकाच वेळी भाजपाला परखड भाषेत खडसावले आहे पण त्यालाही तसा उशीरच झाला आहे असे म्हणावे लागेल.

देशातील हिंदूंच्या हिताची जपवणूक करण्याच्या(political) हेतूने, हिंदूंना न्याय देण्याच्या उद्देशाने आणि हिंदूंचे व्यापक पातळीवर संघटन करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी इसवी सन 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्रात स्थापना केली. नागपूर येथील रेशीम परिसरात संघाचे मुख्यालय आहे. संघाच्या मुशीतून तयार झालेले स्वयंसेवक हे जनसंघ तथा भाजपाचे पाया बनले. भाजपा मधील जवळपास सर्वच नेते हे संघाचं प्रॉडक्ट आहेत. पण तरीही संघाने भाजपला एका ठराविक अंतरावर ठेवून आमचा समाजकारणाशी संबंध आहे राजकारणाशी नाही असे अनेकदा सुचित केले होते. पण सध्या मात्र संघाचे भाजपशी थेट संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे किंवा होताना दिसते आहे.

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जाणवण्याइतपत अपयश मिळाल्यानंतर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी निवडणूक प्रचारातील भाषेची पातळी घसरली होती, समाजात दुही माजवण्याचा, विद्वेष पसरवण्याचा, फूट पाडण्याचा प्रयत्न झाला याबद्दल तीव्र नाराची व्यक्त केली आहे. त्यांचा रोख भारतीय जनता पक्षांच्या नेतृत्वाच्या दिशेने आहे आणि होता. मणिपूर मधील सद्यस्थितीबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तेथील परिस्थिती सुधारण्यावर भर दिला पाहिजे असे त्यांचे मत आहे. मणिपूर हे गेल्या एक-दीड वर्षापासून अशांत आहे. हिंसाचार अजूनही सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मनिपुर मध्ये जाऊन शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे विरोधी पक्षीय नेते गेल्या वर्षभरापासून म्हणत आहेत. आता मणिपूर मधील लोकसभेच्या दोन जागा गमावल्यानंतर डॉक्टर भागवत हे मनिपुर विषयी बोलत आहेत. तसा त्यालाही उशीरच झाला आहे.

संघाची अनेक प्रसारमाध्यमे आहेत. त्यापैकीच एक द ऑर्गनायझर(political) आहे. ते संघाचे मुखपत्रही आहे. त्यातील एका लेखात महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची पडझड का झाली यावर परखडभाष्य केले आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचे स्पष्ट बहुमत महाराष्ट्रात असताना अजित दादा पवार यांना सोबत घेण्याचे कारण काय होते? तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुटुंब कलहामुळे फुटणारच होता असे या लेखात म्हटले आहे. काँग्रेसचे एक नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भारतीय जनता पक्षात घेतल्याबद्दलही या लेखात नाराजी व्यक्त केली आहे. 26 /11 च्या हल्ल्यावर बोलताना याच अशोक चव्हाण यांनी हिंदू आतंकवादी असा शब्दप्रयोग केला होता. संघावर कायम टीका करणारे म्हणून त्यांच्याबद्दल या लेखात उल्लेख होता.

डॉक्टर मोहन भागवत आणि द ऑर्गनायझर यांनी केलेल्या टीका टिपणीवर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीचे राजकारण करायला नसले पाहिजे होते असा सूर संघाच्या मुखपत्राचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला याबद्दल आक्षेप घेण्यात आला आहे. अजित दादांना सोबत घ्यायची गरज नव्हती असे या लेखात म्हटले आहे. याचा अर्थ शिवसेना हा पक्ष फोडला त्याला संघाचे समर्थन होते असे म्हणायचे काय? जेव्हा महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरू होते तेव्हा संघाच्या रेशीम बाग मुख्यालयातून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नव्हती. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.

भारतीय जनता पक्ष आता हा सक्षम आहे. त्याला कुणाच्या मार्गदर्शनाची गरज(political) नाही. संघाचे मार्गदर्शन आम्हाला नको आहे. अशी गरज सर्व आणि वैद्य मरो भूमिका नड्डा यांनी घेतली होती. त्याबद्दलही संघाच्या मुख्यालयातून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती तथापि नाराजीचा सूर मात्र होता. लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा जाणवणे इतका पराभव झाल्यानंतर डॉक्टर मोहन भागवत आणि संघाचे मुखपत्र द ऑर्गनायझर या दोघांनीही
भारतीय जनता पक्षाचे कान पिळले आहेत. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र संघाचा रोख हा अजितदादा पवार यांच्याकडे नसल्याचा केलेला खुलासा हा केविलवाना म्हणावा लागेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघ चालक डॉक्टर मोहन भागवत हे गेल्या दोन वर्षांपासून काहीसे व्यावहारिक पातळीवर उतरलेले दिसतात. नवी दिल्लीत जामा मशिदीचे प्रमुख बुखारी यांची भेट घेणे, आता आणखी कुठल्या मशिदीचे खोदकाम करण्याची गरज नाही हे त्यांनी केलेले वक्तव्य संघाच्या विचारसरणीशी जुळत नाही. तथापि संघाची जनमानसातील प्रतिमा अधिक उजळ करण्यासाठी ते व्यवहारिक पातळीवर आलेले दिसतात. मणिपूर येथील परिस्थितीवर त्यांनी केलेले भाष्य हे त्याचेच प्रतीक आहे.

हेही वाचा :

उर्फी जावेद आणि ओरी लग्नबंधनात अडकणार?

मुंबई आमदारांची बैठकीत BJP च्या मराठा आमदारांची कानउघाडणी

निवडणूक संपताच ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश