कंगणा 20 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत होती रिलेशनमध्ये; स्वत: केला मोठा खुलासा

बॉलीवूडमध्ये(Bollywood) अनेक अभिनेत्रींनी वयाने मोठ्या असलेल्या सेलिब्रिटींसोबत लग्न केले आहे, जसे हेमा मालिनी, सायरा बानो. मात्र, काही अभिनेत्रींना अशा नात्यात केवळ वेदनाच मिळाल्या. अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत ही त्यापैकीच एक असल्याचे म्हटले जाते, जिने वयाच्या १८ व्या वर्षी एका विवाहित अभिनेत्यासोबत नाते ठेवले होते.

कंगना रणौतने एका मुलाखतीत स्वतः तिच्या आणि अभिनेता आदित्य पांचोली यांच्यातील नात्यावर भाष्य केले होते. आदित्य हा कंगनापेक्षा २० वर्षांनी मोठा होता आणि विवाहित व वडीलही होता, हे माहीत असूनही कंगनाने त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले. सुरुवातीला ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि त्यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले.

काही काळानंतर त्यांच्या नात्यात कटुता आली. रिपोर्ट्सनुसार आणि कंगनाच्या आरोपांनुसार, आदित्य पांचोलीने तिला बेदम मारहाण केली, खोलीत डांबून ठेवले आणि तिच्यावर अत्याचारही केले. या अनुभवाने कंगनाला खूप त्रास सहन करावा लागला आणि अखेरीस हे नाते संपुष्टात आले.

या अनुभवानंतर कंगना रणौतने बॉलीवूडमध्ये (Bollywood)आपले स्थान निर्माण केले. तिचे नाव नंतर इतर काही सेलिब्रिटींशी जोडले गेले, पण कोणतेही नाते लग्नापर्यंत पोहोचले नाही. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही, कंगनाने आज एक यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.

अभिनयासोबतच कंगनाने आता राजकारणातही प्रवेश केला आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवून ती पहिल्याच प्रयत्नात खासदार झाली आहे. कंगना अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते, पण आज ती एक यशस्वी अभिनेत्री आणि राजकारणी म्हणून ओळखली जाते.

हेही वाचा :

आईच्या कुशीत निजलेल्या चिमुकलीला बिबट्याने उचललं…

धोनी… तू खरंच ग्रेट! या VIDEO मुळे चाहते पुन्हा पडले ‘कॅप्टन कूल’च्या प्रेमात!

रील बनली पण जीव गेला! पाण्याच्या प्रवाहाने क्षणार्धात महिलेला आत खेचले…थरारक Video Viral