करीना कपूरच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने तिच्या प्रेग्नेंसी काळात एक पुस्तक लिहिले होते(efile). त्या पुस्तकाच्या नावावरून वाद झाला होता. हा वाद आता थेट मध्य प्रदेश हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. क्रिस्टोफर अँथनी नावाच्या वकिलाने अभिनेत्रीविरोधात याचिका दाखल केली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी अभिनेत्रीला नोटीस बजावत उत्तर मागितले आहे.

या प्रकरणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे(efile) न्यायमूर्ती गुरपाल सिंग अहलुवालिया यांनी गुरुवारी (9 मे 2024) करीना कपूर खानला नोटीस बजावली. ॲडव्होकेट अँथनी यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देत मध्यप्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने अभिनेत्री विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली.

करीनाने पुस्तकात ‘करीना कपूर खान प्रेग्नन्सी बायबल’ या टायटलमध्ये, ‘बायबल’ हा शब्द वापरला आहे. त्यामुळे एका समाजाच्या भावना दुखावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे करीनाविरोधात एफआयआर दाखल करावी.

करिना व्यतिरिक्त, Amazon Online Shopping आणि Juggernaut Books या बुक पब्लिशरवरही एफआयआर दाखल करावी, असं याचिकेमध्ये म्हटले आहे. वकील अँथनी यांनी सुरुवातीला जबलपूर येथील स्थानिक पोलीस ठाण्यात करीना कपूर विरोधात तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर ॲडव्होकेट अँथनी यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात धाव घेतली होती. मात्र, ॲडव्होकेट अँथनी आरोप सिद्ध करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे दंडाधिकाऱ्यांनी त्यांची याचिका फेटाळली. यानंतर ॲडव्होकेट ख्रिस्तोफर अँथनी यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली, मात्र तेथेही त्यांना दिलासा न मिळाल्याने न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. यानंतर आता वकील क्रिस्टोफर यांनी मध्यप्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वकीलांनी आता अभिनेत्रीला नोटीस बजावत तिच्याकडून सात दिवसांत उत्तर मागवले.

हेही वाचा :

भाजपच्या कांदा निर्यात बंदीने शेतकरी कंगाल, पाकिस्तान मालामाल !

प्रचार रॅलीत तुफान राडा! महायुती- ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने

‘योगींची हकालपट्टी, अमित शहांना पंतप्रधान करण्याचा डाव’, अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा