कोल्हापूर शहर व परिसरात चाे-यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे(village). गेल्या काही दिवसांपासून शहरात छाेट्या माेठ्या चाे-या झाल्याच्या घटना पाेलिस डायरीमधील नाेंदींवरुन स्पष्ट हाेत आहे. विशेष म्हणजे चाेरट्यांना कोल्हापूराचे ग्रामदैवत कपीलेश्वर मंदिरात देखील हातसफाई केल्याने भाविकांत चीड निर्माण झाली आहे.
कोल्हापूरात शुक्रवारी शहाराचे ग्रामदैवत असलेल्या कपीलेश्वर(village) मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार समाेर आला आहे. कपीलेश्वर मंदिरातील शिवलिंगावरचे तांब्याचे अभिषेकपात्र तसेच पूजेच सर्व साहित्य चोरट्यांनी लंपास केले. या मंदिरातील मारुतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुखवटा देखील चाेरट्यांना लांबविला. या घटनेमुळे भाविकांत चाेरट्यांविषयी चीड निर्माण झाल्याचे चित्र मंदिर परिसरात आज हाेते.
दरम्यान कोल्हापुरात सध्या मॉडीफाय (मूळ स्वरुपात बदल) केलेल्या यामाहा मोटरसायकलींवर चाेरट्यांची नजर पडत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील कसबा बावडा परिसरात यामाहा मोटरसायकलची चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याचे विविध घटनांमुळे समाेर आले आहे. या परिसरात 3 चोरांनी मध्यरात्रीच्या सुमासा दोन यामाहा मोटरसायकली चोरल्याचे सीसीटीव्ही कैद झाले आहे.
हेही वाचा :
वंचितला सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर
विधानसभेपूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी?काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत?
लोकसभेला अपमान झाला म्हणूनच… हसन मुश्रीफ यांच्या विधानाची जोरदार चर्चा