अभिनेत्री कश्मीरा शाहचा एक गंभीर अपघात झाला आहे. त्याचे फोटो कश्मीरानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. रक्तानं माखलेल्या कपड्यांचा फोटो कश्मीरानं शेअर केला असून तिची कोणी विचारपूस करत असल्याचं पाहायला मिळतं आहे(los angeles). तर कृष्णा अभिषेकनं कमेंटमध्ये चिंता व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर इंडस्ट्रीमधील लोकांनी देखील चिंता व्यक्त केली असून नेमकं प्रकरण काय झालं होतं याचा खुलासा कश्मीरानं केला आहे. पण अशात कश्मीरानं एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे.
कश्मीरा शाह ही सध्या (los angeles)लॉस एन्जिल्समध्ये आहे. तर तिचे दोन्ही मुलं रेयान आणि कृषांग हे कृष्णा अभिषेकसोबत मुंबईला परतले. त्यानंतर त्या दोघांनी अनेक रील्स शेअर केले. एकीकडे कृष्णा अभिषेक त्याच्या मुलांसोबत आनंदी आहे आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतोय. तर कश्मीरा त्यांना मीस करते. आता कश्मीरानं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
कश्मीरा शाहनं रक्तानं माखलेल्या कपड्याचा फोटो तिनं शेअर केला आहे. हे शेअर करत कश्मीरानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की ‘देवा, मला वाचवण्यासाठी तुझे आभार. खूप भयानक घटना घडली. काही मोठं होणार होतं, पण नशिबानं थोडक्यात झालं. आशा आहे की दुखापतीचे निशाण राहणार नाही. आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येतेय. कृष्णा अभिषेकसोबत दोन्ही मुलांची नावं देखील लिहिली आहेत.’
कश्मीराच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिच्यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे तर त्याशिवाय या पोस्टवर सेलिब्रिटींनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. राजेश खट्टरनं विचारलं की ‘कैश काय झालं तुला? आशा आहे की सगळं काही चांगलं होईल.’ कृष्णा अभिषेकनं कमेंट केली की ‘देवाच्या कृपेनं तू आता ठीक आहेस.’ किश्वर मर्चेंट म्हणाली देवा, ‘तू ठीक आहेस ना?’ दीपिशिखा नागपालनं लिहिलं की ‘हे काय झालं??? तू लवकर परत ये.’ पूजा भट्टनं देवा, ‘कैश नेमकं काय झालं. आशा करते की ती लवकर ठीक होशील’, अशी कमेंट केली आहे.
हेही वाचा :
सगळ्या राज्यांत दारुबंदी जाहीर करा आणि मग…; संतापलेल्या भारतीय गायकाची कॉन्सर्टमध्ये मागणी
गृहिणींचे बजेट पुन्हा बिघडणार; कांद्याच्या दरात मोठी वाढ
दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी…. Video