बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ कायम आपल्या हाॅट अदांमुळे(viral) चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील कतरिनाची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. ती आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन व्हिडीओ आणि फोटोज शेअर करत असते. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे, ज्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे.
बाॅलिवूडमध्ये दिपीकाच्या प्रेग्नंसीची चर्चा असताना आता कतरिनाच्या देखील प्रेग्नंसीच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या कतरिनाचा एक व्हिडीओ व्हायरल(viral) होत आहे. मुंबईच्या विमानतळावर कतरिना स्पाॅट झाली असताना कतरिनाचा बेबी बंप दिसल्याचं म्हटलं आहे. अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगला कतरिना आणि विक्की जेव्हा या कार्यक्रमासाठी जामनगरमध्ये पोहचले होते तेव्हा देखील कॅमेऱ्यामध्ये कतरिना बेबी बंप लपवताना दिसली होती.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र अद्याप कतरिनाने प्रेग्नंसीबदल वक्तव्य केलेलं नाहीये. तर दुसरीकडे कतरिनाचा पती अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. बॅड न्यूज या आगामी चित्रपटात विकी मुख्य भूमीकेत असून अभिनेत्री तृप्ती डिमरीने त्याच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटातील तौबा तौबा या गाण्यावर विकीने केलेल्या डान्सचं कौतूक केलं जात आहे.
हेही वाचा :
विशाळगडावरील अतिक्रमणे सुटणारा प्रश्न जटिल बनला!
दहावी पास तरुणांसाठी खुशखबर! तब्बल ५० हजार पदांसाठी होणार भरती
‘जातपात सोडा हिंदूंनो, आपण जर…’, केतकी चितळेची मराठ्यांबद्दल वादग्रस्त पोस्ट