मुलांचे संगोपन हे पालकांसाठी (parents) एक महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. मात्र, आधुनिक काळात काही गोष्टींमुळे पालक आणि मुलांमधील दुरावा वाढत चालला आहे. पालकांनी काही चुका न करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे, नाहीतर या चुकांमुळे मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यासाठी काही गोष्टींचे विशेष लक्ष ठेवा:
मुलांच्या चुकांवर सतत ओरडणे टाळा:
मुलं नवीन गोष्टी शिकताना चुका करतात, हे स्वाभाविक आहे. मात्र, त्यांच्या चुकांवर सतत ओरडणे त्यांच्या मनावर नकारात्मक प्रभाव टाकते. चुकांमधून शिकण्यासाठी त्यांना समजावून सांगणे अधिक फलदायी ठरते.
मुलांना वेळ देणे:
दिवसातील व्यस्ततेनंतर मुलांना वेळ देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पालकांनी (parents) घरी आल्यावर फोन किंवा सोशल मीडियावर वेळ घालवण्याऐवजी मुलांशी संवाद साधावा, त्यांना ऐकावे, आणि त्यांच्यासोबत वेळ घालवावा. यामुळे मुलांमधील आत्मविश्वास वाढतो आणि पालकांशी नातं अधिक घट्ट होते.
शाळेतील तणावाची जाणीव:
शाळेत मुलांना अभ्यासाचं तणाव असतं. त्यात काही चुका झाल्यास शिक्षकांचा ओरडा मिळतो, ज्यामुळे त्यांची मनस्थिती खराब होते. अशावेळी, पालकांनी मुलांशी संवाद साधून शाळेत काय शिकवले, काय झालं याबद्दल विचारले पाहिजे, आणि त्यांना समजून घेतलं पाहिजे.
टेक्नॉलॉजीचा संतुलित वापर:
मोबाईल आणि गेम्सचा अतिवापर मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतो. पालकांनी मुलांच्या डिजिटल वेळेवर लक्ष ठेवून, त्यांना समजावून सांगितले पाहिजे की तंत्रज्ञानाचा संतुलित वापर कसा करावा.
पालकांनी (parents) या गोष्टींचे पालन केल्यास मुलांशी असलेले नाते अधिक घट्ट होईल आणि त्यांच्या विकासात सकारात्मक बदल घडून येईल.
हेही वाचा:
कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांचा राजकोट किल्ल्याला ऐतिहासिक दौरा
शिवरायांची एकदा नव्हे 100 वेळा माफी मागायला तयार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह रिलीज डेटची घोषणा