‘जातपात सोडा हिंदूंनो, आपण जर…’, केतकी चितळेची मराठ्यांबद्दल वादग्रस्त पोस्ट

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असलेली अभिनेत्री केतकी चितळेने पुन्हा एकदा वादग्रस्त(social media) पोस्ट केली आहे. केतकीने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता मोर्चामधील एक व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र हा व्हिडीओ शेअर करताना तिने व्हिडीओला दिलेली कॅप्शन फारच वादग्रस्त आहे. केतकीने पुन्हा एकदा ठराविक समाजाला लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे.

सोशल मीडियावर(social media) सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मनोज जरांगे-पाटलांच्या रॅलीमधील आहे. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या एका मुस्लिम बांधवाने एका हातात हिरवा झेंडा आणि दुसऱ्या हातात मनोज जरांगे-पाटलांचा फोटो घेतल्याचं दिसत आहे. हा मुस्लिम बांधव ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून हा व्हिडीओ व्हायरल होत असून हाच व्हिडीओ केतकीने शेअर केला आहे.

केतकीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर, “हातात कुणाच्या कठपुतळीचा फोटो आहे ते बघा,” असं वाक्य लिहिलेलं आहे. म्हणजेच केतकीने जरांगे-पाटील यांचा उल्लेख कठपुतळी असलं केल्याचं सूचित होत आहे. तसेच या व्हिडीओवर, “जातपात सोडा हिंदूंनो, आपण जर एकत्र आलो नाही तर आपल्या घरासमोर हिरवळ दिसायला फार काळ लागणार नाही,” अशीही ओळ लिहिलेली आहे.

केतकीने हा व्हिडीओ शेअर करताना, “आपल्याला अशी हिरवळ बघायची नसेल तर जातपात सोडा, आपण विसरलो आहोत म्हणून यांचे फावते आहे. धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवा. धर्म वाचवण्यासाठी कामाला लागा नाही तर उद्या आपली पोरंबाळं ओला-ओ-उबर करु लागतील,” असं म्हटलं आहे. केतकीने पोस्ट केलेला हा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

केतकी चितळेने यापूर्वीही अनेकदा महाराष्ट्रातील राजकारण असेल किंवा इतर सामाजिक विषयांवर वादग्रस्त विधानं केलेली आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या शरद पवारांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन केतकीला अटकही करण्यात आली होती. तसेच काही आठवड्यांपूर्वी तिने महाराष्ट्र सरकारने वफ्फ बोर्डाला दिलेल्या 10 कोटी रुपयांच्या निधीवरही आक्षेप घेतला होता.

केतकीने सोशल मीडियावरुन पोस्ट केलेल्या वफ्फ बोर्डाच्या निधीसंदर्भातील या व्हिडीओमध्ये राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा संदर्भ देत अशाप्रकारे निधी देण्यास विरोध केला होता. केतकीने अगदी रडत, भावूक होत हा व्हिडीओ पोस्ट केला होता.

हेही वाचा :

आज होणार बहुचर्चित विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान

पेपर लीक प्रकरण: व्हायरल स्क्रीनशॉट प्रकरणी विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल

सांगली: प्रतापसिंह उद्यानात पक्ष्यांचे विश्व उलगडणारे पक्षी संग्रहालय लवकरच खुले होणार