कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : देशातील असहिष्णू वातावरणामुळे अस्वस्थ बनलेल्या साहित्यिक आणि पत्रकार विजय तेंडुलकर यांनी मला कोणी बंदूक आणून देईल काय? असा उद्विक सवाल काही वर्षांपूर्वी जाहीरपणे विचारला होता. आता शनिवारी झालेल्या जागतिक महिला(women) दिनाच्या निमित्ताने आमदार रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींकडे “महिलांना एक खून माफ करण्यात यावा” अशी मागणी केली आहे. लहान मुली, युवती आणि महिला यांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचार, सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.

महिला(women) अधिकाधिक असुरक्षित बनत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी एका अगतिकतेतून ही मागणी केली आहे. शासन आणि प्रशासन विशेषतः पोलीस प्रशासनाला महिलांसाठी भयमुक्त वातावरण तयार करायला अपयश आल्याचा अप्रत्यक्ष ठपका रोहिणी खडसे यांनी यानिमित्ताने ठेवला आहे.
लैंगिक अत्याचार, सामूहिक बलात्कार, विनयभंग यासारखे सामाजिक दृष्ट्या गंभीर गुन्हे घडण्यासाठी महाराष्ट्रात आणि देशात गुन्हेगारांना जे आश्वासक वातावरण तयार झाले आहे ते नष्ट करण्यासाठी कठोर पाऊले उचलली पाहिजेत. त्यासाठी झटपट तपास, मजबूत पुरावा आणि झटपट निकाल अशी भक्कम साखळी तयार केली गेली पाहिजे. बलात्कार केला की अवघ्या काही महिन्यात कठोर शिक्षा होते अशी भीती गुन्हेगारांच्या मनात निर्माण होईल तेव्हा इथल्या महिला सुरक्षित बनतील. एक जागरूक महिला लोकप्रतिनिधी म्हणून रोहिणी खडसे यांनी भयमुक्त व्यवस्थेविषयी प्रयत्न केले पाहिजेत. पण महिलांना एक खून माफ करा ही त्यांची मागणी इथल्या व्यवस्थेवर प्रहार करणारी आहे आणि त्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे.
महाराष्ट्रात विनयभंग, लैंगिक अत्याचार आणि सामूहिक बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. खरे तर ही संख्या कागदावर जेवढी पाहायला मिळते तिच्यापेक्षा जास्त कागदाबाहेर आहे. कारण गुन्हा घडल्यानंतरही प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद देणाऱ्या महिलांची संख्या कमी आहे. कारण पीडित महिलेकडे(women) संशयाने पाण्याची वृत्ती समाजात आहे.
शनिवारी जागतिक महिला दिन साजरा होत असतानाच कर्नाटकातील हम्पी या गावात एका इसरायली तरुणीसह दोघींवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. एकूणच महिला असुरक्षित बनत चालल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझे पाटील याला जी शिक्षा दिली तीच शिक्षा आजच्या काळात देता येणे अशक्य असले तरी बलात्कार करणाऱ्याला”यापेक्षा मरण बरे”असे वाटावे इतकी कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे. इथे असे काही महाशय आहेत की स्वारगेट बस स्थानक परिसरातील शिवशाही बस मध्ये घडलेल्या बलात्कार कांडानंतर पीडित तरुणीवरच संशयाचे वातावरण त्यांनी तयार केले होते.

थॉमसन रायटर फाउंडेशन या संस्थेने महिलांसाठी कोणते देश असुरक्षित आहेत याचे सर्वेक्षण केले आहे. जगातील दहा देश महिलांसाठी कमालीचे असुरक्षित असल्याचे या संस्थेने म्हटले आहे आणि ज्या देशाला आपण भारत माता म्हणतो तोच देश या यादीत पहिल्या स्थानावर आहे. महिला असुरक्षित असल्याच्या देशांची नावे क्रमवारीप्रमाणे अशी आहेत. भारत, अफगाणिस्तान, सीरिया, सोमालिया, सौदी अरेबिया, पाकिस्तान, कांगो, येमेन, नायजेरिया आणि युनायटेड स्टेट्स. ही क्रमवारी ठरवताना लोकसंख्येचा विचार केला गेला आहे. लोकसंख्येच्या तुलनेतील ही क्रमवारी आहे. महिला असुरक्षित बनण्यासाठी काही कारणेही या सर्वेक्षणात पुढे आली आहेत. प्रत्यक्ष युद्ध, युद्धजन्य स्थिती, याशिवाय स्त्रीकडे पाहण्याचा विकृत दृष्टिकोन अशी ही प्रमुख कारणे आहेत.
आपल्या देशात नारीशक्तीला आदिशक्ती मानले जाते. देशात अनेक शक्तीपीठे आहेत. या शक्तीपीठांचा भक्तीचा जागर या देशात केला जातो. त्याच भारतामध्ये स्त्रिया असुरक्षित म्हणत असतील तर ते पुरुषप्रधान संस्कृतीला लांच्छनास्पद आहे. गोवा, अजिंठा वेरूळ अशा अनेक पर्यटन स्थळी परदेशी महिला(women) पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात, त्या सुद्धा असुरक्षित असतील तर जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा कशी काय अबाधित राहू शकते?
लहान मुली, तरुणी आणि महिलांवर लैंगिक अत्याचार या घटना वाढण्यामागे इथली व्यवस्था काही प्रमाणात दोषी आहे आणि म्हणूनच या व्यवस्थेतील दोष काढून टाकण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन केला पाहिजे. हे ज्या दिवशी घडेल किंवा त्या दिशेने पहिले पाऊल पडेल त्या दिवसापासून इथल्या महिला सुरक्षित बनतील.
हेही वाचा :
भारत आणि न्यूझीलंडच्या अंतिम सामन्यात पाऊस अडथळा ठरणार?
14 मार्चचं चंद्रग्रहण ठरणार गेमचेंजर, ‘या’ 4 राशींना लागणार जॅकपॉट! प्रत्येक कामात यश, नोकरीत प्रमोशन, धनलाभ
प्रत्येक महिन्याला महिलांना मिळणार 2500 रुपये, नेमकी काय आहे योजना?