भाजपला खिंडार?; तब्बल ‘इतके’ नेते शरद पवार गटात जाणार?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण(political news today) चांगलंच तापलं आहे. अशात महायुतीला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात नेत्यांच्या इनकमिंग सुरूच असल्याचं चित्र आहे. तर, काही जणांनी घरवापसी केली आहे. आता सोलापूरमधून भाजपला झटका देणारी बातमी समोर आली आहे.

कोल्हापुरात भाजपला(political news today) धक्का दिल्यानंतर आता सोलापुरात शरद पवार दूसरा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. सोलापुरातील भाजपचे नेते आज (10 सप्टेंबर) शरद पवारांची भेट घेणार आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरमधील वसंत नाना देशमुख , माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे नेते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. याचबरोबर भाजपचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील देखील आज शरद पवारांची भेट घेणार आहेत.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने ही भेट होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील जर शरद पवारांच्या गटात गेले तर हा भाजपसाठी विधानसभेपूर्वीच मोठा धक्का मानला जाऊ शकतो.

यापूर्वी कोल्हापूरमधून समरजित घाटगे यांनी भाजपला धक्का दिला. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. अशात इंदापूरचे माजी आमदार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील देखील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

पुण्यातही भाजपची चिंता वाढू शकते. माजी आमदार आणि भाजपचे नेते बापूसाहेब पठारे हे भाजपला रामराम करण्याची शक्यता आहे. वडगाव शेरीची जागा भाजपकडे नसल्याने बापूसाहेब पठारे नाराज आहेत. यामुळेच बापूसाहेब पठारे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यांनी ‘तुतारी’च आपलं चिन्ह असल्याचं जाहीर करत प्रचार करायला देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपला धक्क्यावर धक्के बसू शकतात.

हेही वाचा:

केंद्राने अधिसूचना काढून औषध कंपन्यांना दिला डोस

शुभवार्ता! महालक्ष्मी आगमनाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त

भारतातील आरक्षण केव्हा संपणार?, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच मोठ विधान