भाजपला खिंडार; मोठा नेता लागला शरद पवारांच्या गळाला

विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी आणि त्यानंतरही शरद पवार(political news) यांनी भाजप आणि महायुतीला मोठे धक्के दिले आहे. कोल्हापूरमधील कालग मतदारसंघातील भाजपचे मोठे नेते समरजित घाटगे यांनी काही दिवसांपूर्वी तुतारी हाती घेतली होती. त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि काही नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. दरम्याने अर्ज दाखल करण्याासाठी दोन दिवस शिल्लक असताना विदर्भात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा (political news)मतदारसंघातील दिवंगत राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. ऐन निवडणुकीत हा मोठा धक्का मानला जात आहे. ज्ञायक हे आता तुतारीच्या चिन्हावर कारंजा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ज्ञायक पाटणी यांनी मुंबईत समर्थकांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

राजेंद्र पाटणी यांचे फेब्रुवारीमध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांचे पुत्र ज्ञायक पाटणी हे कारंजामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र भाजपकडून त्यांना ऐनवेळी डावलण्यात आलं. त्यामुळे त्यांनी आज त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत तुतारी चिन्हावर या ठिकाणावरून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा :

हातात चाकू पकडून खिळ्यावर बॅलेन्स अन् पाठीवर गोनी; तरूणाचा धोकादायक स्टंट Video

बॉक्स ऑफिसवर दणका उडवला, आता ‘धर्मवीर 2’ घरबसल्या पाहता येणार

टेस्टमध्ये पराभवानंतर टीम इंडियापासून वेगळे झाले रोहित आणि विराट, मॅच संपल्यावर घेतला निर्णय