टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल हा नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतो. शुभमन गिल त्याच्या मैदानातील खेळामुळे चर्चेत असतोच मात्र त्यासोबतच त्याचे लुक्स आणि अफेरच्या चर्चा देखील खूप रंगतात. बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर्समधील जवळीक काही नवीन नाही, अनेक क्रिकेटर्सनी बॉलिवूड अभिनेत्रींना डेट करून त्यांच्याशी लग्न देखील केलंय. शुभमन गिलचं नाव देखील अनेक(Entertainment news) अभिनेत्रींशी जोडलं जातं, आता अक्षय कुमार सोबत बॉलिवूड चित्रपटात काम केलेल्या एका अभिनेत्रीने तिला शुभमन गिलला डेट करायचंय अशी इच्छा व्यक्त केलीये.
अक्षय कुमार सोबत ‘खेल खेल में’ या चित्रपटात काम केलेली(Entertainment news) अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल हिने एका मुलाखतीत बोलताना म्हटलं की, ‘तिला शुभमन गिल खूप क्युट वाटतो आणि ती त्याला डेट करू इच्छिते’. एका मुलाखतीदरम्यान मुलाखतकाराने प्रज्ञाच्या फोटोंखालील कमेंट्स तिला वाचून दाखवल्या. यात तिच्या एका फॅन्सनी लिहिले की, ‘प्रज्ञा आणि शुभमन एक रोमॅंटिक कपल असते तर’.
प्रज्ञाने उत्तर देताना म्हंटले की, ‘तो खूप क्यूट आहे यार, चला तुम्हा सर्वांच्या मनासारखे व्हावे. तशीही मी सिंगल आहे, या वाक्याला खरं करून टाका. आमची जोडी जुळवा यार!’. प्रज्ञाला विचारण्यात आले की, तिला क्रिकेटरला डेट करायचंय का? यावर प्रज्ञा म्हणाली की, ‘जर हे लिहिलंय तर हे होईलच. मला म्हणायचंय की मी कधीही कोणत्या क्रिकेटर विषयी माझ्या मनात कोणतीही गोष्ट ठेवलेली नाही. जर तो चांगला व्यक्त असेल आणि आमच्यात चांगलं जमत असेल तर का नाही?
तमिळ आणि तेलगू सिनेश्रुष्टीमध्ये प्रज्ञा जयस्वाल हा खूप लोकप्रिय चेहेरा आहे. तिने काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारच्या खेल खेल मे या चित्रपटातून डेब्यू केला होता. या चित्रपटात तिचा अभिनय लोकांना फार आवडला मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. शुभमन गिलबद्दल बोलायचं झालं तर त्याच नाव आतापर्यंत सारा तेंडुलकर आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्याशी जोडलं गेलं आहे. अनेकदा तो सारा सोबत कॅफे आणि इव्हेंट्समध्ये एकत्र दिसला. मात्र अद्याप त्याने त्याच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केलेला नाही.
हेही वाचा :
ईव्हीएम मशीन बद्दलची नेहमीचीच’ “ओ” रड कथा!
भारतविरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार रंगणार…
पिटुकल्या हत्तीचा मजेदार डान्स! तरुणींच्या चालींची केली नक्कल; क्युट…Video Viral