भाजप पदाधिकाऱ्यावर चाकूने हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

भाईंदरमध्ये आज सकाळी भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्यावर चाकूने हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्याचा उद्देश आणि कारणे अद्याप स्पष्ट नाहीत, परंतु हा हल्ला राजकीय (political)किंवा वैयक्तिक वैरातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. पदाधिकाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

हा हल्ला नेमका कशामुळे झाला, याबद्दल अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे आणि दोषींना कठोर शिक्षा होण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा:

200 कोटींच्या फसवणुकीत सुकेश चंद्रशेखरला दिलासा; जामीन मंजूर

छत्रपती शिवराय आमचे आराध्य दैवत; आम्ही त्यांची माफी मागतो: पंतप्रधान मोदी

सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स आयोजित दहीहंडी स्पर्धेत उत्साहाचा कळस