सांगलीमध्ये कोयता गॅंगची दहशत कायम असल्याचं समोर आलंय.(making reels) कारण मिरजेत कोयत्याने हल्ले होण्याच्या घटना चालूच आहेत. आता ‘इन्स्टाग्रामवर स्टोरी का बघतोस?’ म्हणून एका युवकावर दोघांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या दोघांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..सांगलीच्या मिरजेत कोयत्याने हल्ले होण्याच्या घटना काही थांबत नसल्याचं दिसतंय. किरकोळ कारणावरुनही हल्ले होत आहेत. इन्स्टाग्रामवर स्टोरी बघतोस, या क्षुल्लक कारणावरून एका तरूणावर चक्क कोयता आणि चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना काल २७ ऑगस्ट रोजी घडली आहे. धीरेन उर्फ यश रवी पालेकर, असं हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
धीरेनवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान धीरेनवर जीवघेणा हल्ला करणारे दोन संशयित आरोपी राजकुमार माने आणि सरफराज सय्यद (making reels)असल्याचं समोर आलंय. त्यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे मिरजेत मोठी खळबळ उडाली आहे. इन्स्टाग्राम स्टोरी बघण्यावरून वाद झाला होता, अशी माहिती मिळत आहे.
काही महिन्यापूर्वी मिरजेमध्ये कोयता गॅंगची दहशत बघायला मिळाली होती. तर आता किरकोळ कारणावरून दोन युवकांनी एकावर कोयता आणि चाकूनेच वार करून गंभीर जखमी केलंय. इन्स्टाग्रामवर स्टोरी, या किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून तरूणावर (making reels)कोयत्याने वार केले होते. या घटनेत तरूण गंभीर जखमी झाला होता. सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, या घटनांमुळे मिरजमध्ये कोयता गॅंगची दहशत पाहायवसा मिळत आहे.
हेही वाचा:
ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांवर आरोप: ‘मोदींच्या हस्तलाघवाने वास्तूंची दुर्दशा’
महाराष्ट्रात पावसाचा कहर: पुणे, रायगड ऑरेंज अलर्टवर; 22 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
गौतमी पाटील बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार? चर्चेच्या पार्श्वभूमीवर तिची प्रतिक्रिया