नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर(attack) चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्षाने हा हल्ला केल्याचा आरोप माजी नगराध्यक्षाने केला आहे. राजकीय पूर्ववैमनस्य आणि वैयक्तिक बदनामी केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. कुणाल राठोड असं जखमी झालेल्या ठाकरे गटातील नगराध्यक्षाचं नाव आहे.
कुणाल राठोड हे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष(attack) आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते आपल्या मित्रासोबत हिमायतनगर शहरातील श्री. परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयाजवळ चर्चा करत बसले होते. काही वेळानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष राम सूर्यवंशी हा तिथे आला.
यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर सूर्यवंशी याने चाकूने कुणाल राठोड याच्या पायावर वार केला. यामध्ये ते जखमी झाले. घटनेनंतर त्यांना उपचारासाठी हिमायतनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होत. मात्र रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
ठाकरे गटाचे माजी नगराधक्ष कुणाल राठोड आणि भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष राम सूर्यवंशी हे जिवलग मित्र होते. काही कारणावरून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. मागील चार ते पाच वर्षांपासून त्यांच्यात राजकीय पूर्ववैमनस्यातून शाब्दिक वाद देखील होत असायचे. त्यातच काही दिवसांपासून कुणाल हा वैयक्तिक बदनामी करायचा असा संशय राम सूर्यवंशीला होता.
याच कारणावरून सूर्यवंशी याने कुणालवर चाकूने हल्ला केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं संपूर्ण नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
मानसिक आणि शारीरिक संतुलनासाठी उपाय
कोल्हापुरात खुलेआम वेश्याव्यवसाय; मुख्यमंत्र्यांची शिवसेना आक्रमक
मुसळधार पावसाने पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढून 25.11 फुटांवर