कोल्हापूर(Kolhapur) शहरासह जिल्ह्यामध्ये गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट सुरूच असून यामध्ये डॉक्टरांचा सुद्धा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोल्हापूर शहराच्या वेशीवर असलेल्या कळंब्यामध्ये मोठी कारवाई करण्यात आली असून गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.

यामध्ये महिला डॉक्टर सुद्धा ताब्यात घेण्यात आली असून श्रद्धा हॉस्पिटल सील करण्यात आलं आहे. गर्भलिंग निदान करून गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बीएएमएस महिला डॉक्टरसह कळंबा मेन रोडवरील दवाखान्यावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये डॉक्टर दिपाली सुभाष ताईंगडे (वय 46 रा. कळंबा साईमंदिरसमोर, कोल्हापूबर) हिला ताब्यात घेण्यात आलं आहे. सुप्रिया संतोष माने (वय 42, रा. रायगड काॅलनी, कळंबा) आणि धनश्री अरुण भोसले (वय 30, रा. शिंगणापूर) यांनाही अटक करण्याता आली आहे. पथकाकडून रोख रकमेसह गर्भपाताच्या गोळ्यांचे पाच किट जप्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार कळंब्यामधील(Kolhapur) साई मंदिर जवळील श्रद्धा दवाखान्यामध्ये गर्भ गर्भलिंग निदान केले जात असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आरोग्य विभागाकडे करण्यात आली होती. करवीर तालुका जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने परिसरात सापळा लावत एका महिलेला डॉक्टर दिपालीकडे पाठवले होते.

गर्भलिंग निदान करून सर्वप्रथम गोळ्या देण्यासाठी रक्कम ठरवण्यात आली होती. दिपालीने डमी महिलेला गर्भपाताच्या गोळ्या देत गर्भलिंग तपासण्यासाठी एक व्यक्ती येईल, अशी माहिती दिली. यानंतर अवैध प्रकार सुरु असल्याचे कळताच छापा टाकून कारवाई करण्यात आली. गर्भपाताची तीन पाकिटे जप्त करण्यात आली. झाडाझडतीनंतर रुग्णालय सील करण्यात आले.
दरम्यान, ताईगडे बीएएमएस डॉक्टर आहे. रुग्णांची संख्या मर्यादित असूनही काही वर्षांपासून छोट्या जागेत चाललेल्या महिला डॉक्टरने कळंब्यात टोलेजंग इमारत उभी केली आहे. तळमजल्यावरील दुकान गळ्यात जिम, दुकान मेडिकल आहे. पहिल्या मजल्यावर दवाखाना, तिसरा मजला हॉटेलसाठी देण्यात आला आहे. त्यासाठी 50 ते 60 हजार भाडे असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा :
आर्चीसोबत लग्न करणार का? कृष्णराज महाडिकांनी खरं खरं सांगून टाकलं
महाराष्ट्र हादरला! शिक्षकाचा दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यावर…
शेजाऱ्याचे आपल्या आईसह प्रेमसंबंध, मुलाने काटा काढण्यासाठी लावला इलेक्ट्रिक ट्रॅप, पण…
अभिनेत्री सुरभी हांडेची ‘गाववाटा’ ट्रॅव्हेल सीरीज प्रदर्शित